Maharashtra Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update: राज्यात काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार, वाचा हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Weather Update: दक्षिण गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीवर हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांसह विविध भागात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे, काही भागात पावसाची प्रतीक्षा आहे, तर अनेक भागांमध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज देखील हवामान विभागाकडून (IMD)राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीवर हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांसह विविध भागात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये विदर्भातील अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान विभागाकडून तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विजांच्या कडकाडाटासह पावसाची शक्यता आहे. पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

पुणे शहर परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर या ठिकाणी आज (शुक्रवारी) मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, पुणे शहर परिसरात ढगाळ वातावरण दिसून येत आहे, पुण्यासह, कोल्हापूरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्याचा काही भाग वगळता उर्वरित राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असेल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली होती.

कोणत्या भागात पावसाची शक्यता

पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात तसेच दक्षिण नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, दिंडोरी, निफाड, येवला, नांदगाव, चांदवड तालुक्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने आज सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, पालघरसह कोकण किनारपट्टी भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT