weather update Konkan-Central region heat up Meteorological department warning redalert
weather update Konkan-Central region heat up Meteorological department warning redalert esakal
महाराष्ट्र

Weather Update : पारा वाढणार, कोकण-मध्यभाग तापणार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : यंदा राज्याला पुन्हा एकदा उष्णतेच्या तीव्र झळा सहन कराव्या लागण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यात राज्याच्या बहुतांशी भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहू शकते. महाराष्ट्राच्या पश्चिम भागात म्हणजेच कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

एप्रिल महिन्यात मराठवाडा आणि विदर्भात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची, तर उर्वरित महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात (एप्रिल ते जून) महाराष्ट्राच्या बहुतांशी भागात कमाल तापमान सरासरी इतके राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह, पश्चिम विदर्भात तापमान सरासरी इतके राहणार आहे.

पूर्व विदर्भ, कोकणात सरासरीपेक्षा अधिक तापमानाचा अंदाज आहे. राज्याच्या काही भागांत उष्णतेच्या लाटा येण्याचा इशाराही हवामान विभागाने वर्तविला आहे.  उन्हाळा हंगामातील (एप्रिल ते जून) तापमानाचा अंदाज शनिवारी (ता. १) हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्यूंजय महापात्रा यांनी जाहीर केला.

यंदाच्या उन्हाळ्यात (एप्रिल ते जून) दक्षिण द्वीपकल्प आणि वायव्य भारताचा भाग वगळता उर्वरित देशात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. तर देशाच्या बहुतांशी भागात किमान तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.

या राज्यांना फटका

देशाच्या मध्य पूर्व आणि वायव्य भागामध्ये उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता अधिक असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. एप्रिल महिन्यात बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगालचा दक्षिणेकडील भाग, उत्तर छत्तीसगड, गुजरात, पश्चिम उत्तर प्रदेश, पंजाब हरियाना राज्यांत तीव्र उष्ण लाटेची शक्यता आहे.

‘ला-निना’ची स्थिती निवळली

विषुववृत्तीय प्रशांत महासागरात असलेली ‘ला - निना’ची स्थिती निवळली असून, महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान सर्वसामान्य स्थितीत आहे. पुढील काळात समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढण्याची शक्यता आहे. हिंद महासागरातील इंडियन ओशन डायपोल स्थिती (आयओडी) सध्या सर्वसामान्य असून, उन्हाळा हंगामात ही स्थिती सर्वसामान्य राहण्याचा अंदाज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT