weather update maharashtra heat wave Chandrapur at 45 degrees pune  sakal
महाराष्ट्र बातम्या

विदर्भात चटका वाढणार चंद्रपुरातील पारा ४५ अंशांवर

विदर्भात उष्ण लाटेचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : विदर्भात पुन्हा उन्हाचा चटका वाढला आहे. चंद्रपूर येथे उष्णतेची लाट आली असून, शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत चंद्रपूर येथे देशातील उच्चांकी ४५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज विदर्भात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला असून, उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे. राज्यात उन्हाचा चटका असह्य होत असून, दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे अशक्य होत आहे. किमान तापमानात वाढ झाल्याने रात्रीच्या वेळी उकाडाही जाणवत आहे. चंद्रपूरसह वर्धा, यवतमाळ, ब्रह्मपुरी येथील तापमान ४४ अंशांच्या पुढे गेले आहे. राज्यात मुख्यतः उष्ण व कोरड्या हवामानाचा अंदाज असून, उन्हाचा चटका कायम राहणार आहे.

विदर्भात उन्हाचा ताप वाढत असल्याने आज बहुतांशी भागात उष्ण लाटेचा इशाराही देण्यात आला आहे. यातच विदर्भ आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. मध्यप्रदेश, विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक, तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने राज्यात ढगाळ हवामान निर्माण होण्याची शक्यता आहे.

सौर प्रकोप

  • चंद्रपूर ४५.२

  • वर्धा ४४.४

  • यवतमाळ ४४.२

  • ब्रह्मपुरी ४४.

येलो अलर्ट

अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke: ‘कॉक्रोच’ शब्दावरून मोठा खुलासा; अभिजीत दीपके यांचा दावा, तर CJI सूर्यकांत यांच्याबाबत सौरभ दास काय म्हणाले?

Marathi News Live Updates : गुरमीत राम रहीमला पुन्हा 21 दिवसांची फर्लो मंजूर; आतापर्यंत 17 वेळा आला तुरुंगाबाहेर

Vaibhav Sooryavanshi : वैभवने दुलीप ट्रॉफीच्या सामन्यात 'हे' काय केलं? फोटो व्हायरल होताच सुरू झालीय उलटसुलट चर्चा

अशी सासू सर्वांना मिळो! मृणाल कुलकर्णी शिवानीबद्दल म्हणाल्या…'मला अजिबात तिची सासू वगैरे...'

Ratnagiri Airport Update : रत्नागिरी विमानतळावरून लवकरच उड्डाण! 90 टक्के काम पूर्ण; पाहा कसे असणार अत्याधुनिक टर्मिनल? पालकमंत्री उदय सामंतांकडून पाहणी

SCROLL FOR NEXT