Mumbai Rain Updates esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update: राज्याच्या अनेक भागात पावसाची विश्रांती; पुन्हा कधी मुसळधार? वाचा हवामान खात्याचा अंदाज

राज्याच्या बहुतेक भागांमध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. हवामान विभागाने पुढचे तीन ते चार दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला असला तरी अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे.

हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण हे सरासरीपेक्षा कमी असणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच या अंदाजानुसार परिस्थिती दिसुन येत आहे. कोकण आणि विदर्भातील काही भाग वगळला असता गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारली आहे.

दरम्यान राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मुंबईसह, पुणे जिल्ह्यातही पावसाने उघडीप घेतली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील आठवडाभर पुण्यात ढगाळ राहील वातावरण ढगाळ राहील, अनेक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

आज पालघर, ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडुन वर्तवण्यात आला आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर कोकण विभागात 10 ऑगस्टपर्यंत मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उर्वरित राज्यात पावसाचा जोर कमी असेल, असा अंदाज IMDने वर्तवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashes 2025-26 Details: सुरू होतोय ऍशेस मालिकेचा रोमांचक थरार! भारतात कुठे आणि कसे पाहाणार सामने? जाणून घ्या सविस्तर

Jui Gadkari : जुई गडकरींच्या जीवावर बेतलेला क्षण! रॉयल पाल्म्समध्ये ऑडिशनच्या नावाखाली ‘चकवा’!

'कोण आहे तो शाहरुख खान?' 2050 पर्यंत सुपरस्टारला लोक विसरुन जातील, विवेक ओबरॉयचं वक्तव्य चर्चेत

Latest Marathi News Update LIVE : जामनेरच्या नगराध्यक्षपदी मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी बिनविरोध

आठवीतली ती अन् इंजिनिअरिंगला असलेला तो; खिडकी ठरली मध्यस्थी, घरच्यांना कळलं तेव्हा... वैशाली सामंतची लव्हस्टोरी माहितीये?

SCROLL FOR NEXT