weather update maharashtra Vidarbha heat wave Yellow alert issued mumbai
weather update maharashtra Vidarbha heat wave Yellow alert issued mumbai sakal
महाराष्ट्र

विदर्भ तापणार उष्णतेची लाट : यलो अलर्ट जारी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ढगाळ वातावरणामुळे दोन-तीन दिवस दिलासा दिल्यानंतर विदर्भात पुन्हा उन्हाची लाट परतली आहे. प्रादेशिक हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ दिल्याने सोमवारपासून (ता.९) कडक ऊन पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भातील अमरावती, अकोला, वाशीम, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर या सात जिल्ह्यांमध्ये तापमान वाढण्याचा अंदाज आहे.

देशातील अनेक राज्यांमधील तापमानात वाढ होत आहे. सध्या मध्य महाराष्ट्रात असलेली उष्णतेची लाट विदर्भातही पसरली आहे. या लाटेमुळे नागपूरसह सर्वच जिल्ह्यातील कमाल तापमानात वाढ होऊन, उकाडा व चटकेही वाढले आहेत. रविवारी अपेक्षेप्रमाणे पाऱ्याने उसळी घेतली. चोवीस तासांत नागपूरच्या तापमानात जवळपास दीड अंशाची वाढ होऊन पारा ४३ अंशांवर गेला. ब्रम्हपुरीचाही पारा दोन अंशांनी वाढला. येथे नोंदविण्यात आलेले ४४.९ अंश सेल्सिअस तापमान विदर्भात सर्वाधिक ठरले. त्याखालोखाल तापमानाची नोंद अकोला (४४.४ अंश), चंद्रपूर (४४.२ अंश), वर्धा (४४.२ अंश) आणि अमरावती (४४ अंश) येथे करण्यात आली. इतरही जिल्ह्यांमध्ये उन्हाचे तीव्र चटके जाणवले. हवामान विभागाने सोमवारपासून नागपूर, अकोला, चंद्रपूरसह काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट दिल्याने पारा पुन्हा भडकण्याची दाट शक्यता आहे. या आठवड्यात कमाल तापमान ४५ ते ४६ अंशांवर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ११ मेपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.

तापमान तीन अंशांनी वाढणार

काही राज्यांतील तापमान पुढील तीन दिवसांत दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ के. एस. होसळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ ते ११ दरम्यान पश्चिम राजस्थान, ९ ते ११ पर्यंत दक्षिण हरियाना व पूर्व राजस्थान; ८ व ९ रोजी पश्चिम मध्य प्रदेश, १० व ११ मे रोजी दक्षिण पंजाबमध्ये उष्णतेची लाट निर्माण होण्याचा अंदाज आहे.

विदर्भातील तापमान (अंश सेल्सिअस)

ब्रह्मपुरी ४४.९, अकोला ४४.४, चंद्रपूर ४४.२ , वर्धा ४४.२ , अमरावती ४४.०, नागपूर ४३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Hardik Pandya MI vs KKR : पांड्यानं केली मोठी चूक; त्याच्यामुळेच मुंबईची ही अवस्था... इरफाननं कॅप्टन हार्दिकवर साधला निशाणा

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

"माझी लाडकी जिवंत आहे", आई 3 दिवस मुलीच्या मृतदेहासोबत झोपली! पोलीस आले अन्...

Latest Marathi News Live Update : उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT