weather update maharashtra Warning of heat wave in Vidarbha
weather update maharashtra Warning of heat wave in Vidarbha  sakal
महाराष्ट्र

राज्यात उन्हाचा कहर कायम

सकाळ वृत्तसेवा

पुणे : उन्हाचा कहर वाढल्याने वैशाखपूर्व वणव्यात विदर्भासह महाराष्ट्र अक्षरश: होरपळून निघाला आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत विदर्भातील चंद्रपूर येथे राज्याचे यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उद्या विदर्भात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे, उर्वरित राज्यात उन्हाची ताप कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सूर्य आग ओकत आहे. उन्हाचा चटका तापदायक ठरत असल्याने अंगाची लाही-लाही होत आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात उष्ण लाट आहे. चंद्रपूरसह अकोला, ब्रह्मपुरी, अमरावती, वर्धा, नागपूर, यवतमाळ येथे ४५ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. तर जळगाव, परभणी येथे ४४ अंशापेक्षा अधिक तापमान असून, उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम आहे.

उन्हाच्या चटक्यात होरपळणारी ठिकाणे

चंद्रपूर ४६.४, अकोला ४५.८, ब्रह्मपुरी ४५.६, अमरावती ४५.०, वर्धा ४५.३, नागपूर ४५.२, यवतमाळ ४५.२. जळगाव ४४.८, परभणी ४४.२

उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) :

विदर्भ : अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT