weather update maharshtra rain forecast imd warn next two days heavy rainfall alert sakal
महाराष्ट्र बातम्या

Rain Forecast : मॉन्सूनने देश व्यापला; पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढेल, हवामान खात्याचा अंदाज

रविवारी शहरातील अनेक भागांत ऊन सावल्यांचा खेळ पाहायला मिळाला तर अधून-मधून पावसाच्या सरी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सहा दिवस आधिच मॉन्सूनने संपूर्ण देश व्यापला असून, पुढील दोन दिवस शहरात पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. शहरात दिवसभर आकाश ढगाळ आणि बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. याच काळात घाटमाथ्यावर मात्र मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

रविवारी शहरातील अनेक भागांत ऊन सावल्यांचा खेळ पाहायला मिळाला तर अधून-मधून पावसाच्या सरी पडत होत्या. दिवसभरात शिवाजीनगर येथे ४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली तर सर्वाधिक पाऊस चिचवड येथे ११.५ मिलिमीटर येवढा पडला.

पुढील काही दिवस शहरात पावसाचा जोर कायम राहील. राज्यातही कोकण, घाटमाथ्यावर पावसाची संततधार सुरू असली, तरी उर्वरित राज्यात पावसाने उसंत घेतल्याचे चित्र आहे. राज्यात अनेक भागांत ऊन-सावल्यांच्या खेळात अधून-मधून पावसाच्या सरी पडत आहेत.

सोमवारी (ता. ३) दक्षिण कोकण, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

वायव्य उत्तर प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या बिकानेरपासून, ग्वालियर, अंबिकापूर, बालासोर, ते बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे.

दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून केरळपर्यंत किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तर मध्य बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून ४.५ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर.

जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :रायगड, पुणे.

विजांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ATM Transaction Fees : आता ATM मधून पैसे काढणं महागलं! SBI ग्राहकांच्या खिशाला कात्री; व्यवहाराआधी जाणून घ्या नवे शुल्क

Nashik Municipal Election : नाशिक मनपा निवडणूक: प्रभाग २९ मध्ये 'हाय व्होल्टेज' ड्रामा; बडगुजर की शहाणे, कोणाचा होणार राजकीय उदय?

Kolhapur City : सार्वजनिक वाहतूक सक्षम न झाल्यास कोल्हापूर आणखी मागे पडेल; वकिलांचा इशारा आणि ठोस मागण्या

Bigg Boss Marathi 6 : "माझ्यामुळे 50 मुलांना प्रवेश मिळाला" Viral व्हिडीओवर दिव्याचा खुलासा; नेटकरी म्हणाले..

Wani News : आदिमायेचे सुवर्णरूप! सप्तशृंगगडावर अनुभवा निसर्गाचा अद्वितीय सोहळा; सुवर्णकिरणांनी मूर्ती न्हाली

SCROLL FOR NEXT