Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update: राज्यासह देशभरात थंडीची लाट! तर 'या' भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता

Weather Update: 18 जानेवारी 2024 रोजी देशाच्या पूर्वेकडील भागात, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार आणि ओडिशामध्ये ऐन हिवाळ्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात कडाक्याची थंडी आहे. मध्य भारतातील राज्यांमध्ये धुके आणि थंडीच्या लाट कायम आहे. दिल्लीतील तापमान 4 अंश सेल्सिअसच्या खाली आहे. राजधानीत दाट धुके आणि शून्य दृश्यमानता यामुळे अनेक विमान उड्डाणे आणि रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत. जम्मू-काश्मीर, लडाख आणि उत्तराखंडमध्ये आज बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि हरियाणामध्ये कोल्ड वेव्ह अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तर आज18 जानेवारीला बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्किम आणि पूर्वोत्तर भारतात काही ठिकाणांवर हलका ते मध्यम स्वरुपातील पाऊस होण्याची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड आणि सिक्किममध्ये विविध ठिकाणांवर गारपीट होण्याची शक्यता आहे. अंदमान आणि निकोबार द्वीप समूह, तामिळनाडूच्या दक्षिण भागांमध्ये आणि लक्षद्वीपमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.

पुढील दोन ते तीन दिवस म्हणजेच 18-21 जानेवारी दरम्यान देशातील विविध भागांमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर राजस्थान, झारखंड, उप-हिमालयी पश्चिम बंगाल, सिक्किम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरामध्ये दाट धुक्यांची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागांमध्येही थंडी कायम राहणार आहे.

महाराष्ट्रात कशी परिस्थिती?

उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्याच्या प्रभावाने मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील तापमानात मोठा बदल झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या 48 तासांपासून राज्यातील अनेक भागांत थंडीची लाट दिसून येत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये या आठवड्यापर्यंत थंडी कायम राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT