महाराष्ट्र बातम्या

Weather Update: मुंबई, ठाण्यासह या भागात उष्णतेची लाट; तर विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट, वाचा हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Weather Update: मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा जिल्ह्यासह, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी ढगाळ हवामान होते.

अंकिता खाणे (Ankita Khane)

पुणे: राज्यात उन्हाचा चटका पुन्हा वाढत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ हवामान आणि उकाडा कायम आहे. मंगळवारी (ता. १६) मुंबईसह उत्तर कोकणात उष्ण लाटेचा इशारा (यलो अलर्ट), तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका, उकाडा वाढण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा जिल्ह्यासह, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी ढगाळ हवामान होते.

बुधवारी (ता. १७) धाराशिव जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा आहे; तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज आहे. पुढील दोन दिवसांत राज्याच्या काही भागात कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

विदर्भ, मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अन्य ठिकाणी गेल्या चार-पाच दिवसात पावसाने हजेरी लावली आहे. पुढील 24 तासातही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तर कोकणातील काही भागात आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

विदर्भासह मराठवाड्यात अवकाळी पावसाचा शेती पिकांना आणि फळबागांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता असल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. महाराष्ट्रासह अन्य काही राज्यामध्येही अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि कर्नाटकमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दिल्ली, हिमाचल, हरियाणा, पंजाब, चंदीगड आणि पश्चिम मध्य प्रदेशमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस पडू शकतो. कर्नाटकातही 17 एप्रिलपर्यंत येथे पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT