Taj Hotel Terror Attack esakal
महाराष्ट्र बातम्या

'माझी संपूर्ण मालमत्ता बॉम्बने उडवून द्या, पण दहशतवाद्यांना..'; ताज हॉटेलवरील हल्ल्यानंतर काय म्हणाले होते रतन टाटा?

Taj Hotel Terror Attack : देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या 86 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) निधन झालं.

सकाळ डिजिटल टीम

मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांनी प्रसिद्ध ताज हॉटेललाही (Taj Hotel Terror Attack) लक्ष्य केलं होतं.

Ratan Tata Passed Away : देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या 86 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) निधन झालं. भारतासह जगातील लोक रतन टाटा यांना त्यांच्या साध्या स्वभावामुळे ओळखायचे. कर्मचाऱ्यासांठी ते देवासमान होते. मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांनी प्रसिद्ध ताज हॉटेललाही (Taj Hotel Terror Attack) लक्ष्य केलं होतं.

त्यादिवशी या घटनेचा उल्लेख रतन टाटा यांनी एका मुलाखतीत केला होता. त्यांनी सांगितलं की, हॉटेलमध्ये गोळीबार झाल्याचा मला कोणाचा तरी फोन आला होता. यानंतर मी ताज कर्मचाऱ्यांना माहितीसाठी फोन केला; पण त्यांनी माझा फोन उचलला नाही. मी माझी गाडी काढली आणि ताजला पोहोचलो, पण चौकीदाराने मला बाहेरच थांबवलं, कारण तिथं गोळीबार सुरू होता.

'एकही दहशतवादी जिवंत राहता कामा नये'

यावेळी त्यांनी तिथं उपस्थित सुरक्षा जवानांना सांगितलं की, जर गरज असेल तर माझी संपूर्ण मालमत्ता बॉम्बने उडवून द्या, मला त्याची चिंता नाही; पण एकही दहशतवादी जिवंत राहता कामा नये. रतन टाटा यांनी पुढं सांगितलं की, त्यावेळी ताज हॉटेलमध्ये 300 पाहुणे उपस्थित होते. उपाहारगृहे भरलेली होती. तिथं उपस्थित कर्मचाऱ्यांनी सर्वांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्या काळात अनेकांचे बळीही गेले. त्या तीन दिवस आणि तीन रात्री रतन टाटा ताज हॉटेल व्यवस्थापनाच्या पाठीशी उभे राहिल्याचे त्यांनी मुलाखतीत सांगितले.

'..तर ताज आज जसा आहे, तसा तो कधीच बनला नसता'

व्यवस्थापन आणि सहकाऱ्यांच्या पाठीशी रतन टाटा नेहमीच उभे राहिले. ताज हॉटेलबद्दल ते म्हणायचे की, ''त्याची भव्यता असूनही, त्याच्या मागे काम करणाऱ्या लोकांची मेहनत नसती तर ताज आज जसा आहे तसा तो कधीच बनला नसता. ते (कर्मचारी) स्वत:चा जीव धोक्यात घालून उपस्थित लोकांना वाचवण्यासाठी स्वत:चा जीव गमावून उभा राहिला.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT