महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर काय? मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टच सांगितलं

कार्तिक पुजारी

मुंबई- मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. हा अल्टिमेटम २४ तारखेला संपणार आहे. ४० दिवसांत मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन सरकारने जरांगे पाटील यांना दिलं होतं. सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला नाही, तर काय करणार असा प्रश्न जरांगे पाटील यांना 'साम टिव्ही'वरील मुलाखतीमध्ये विचारण्यात आला होता.

यावर उत्तर देताना जरांगे पाटील म्हणाले की, 'शांततेतलं युद्ध सरकारला पेलणार आणि झेपणार नाही. पण, आरक्षण आम्ही घेणारच. मला असं वाटतंय की सरकार २४ तारीख उजाडू देणार नाही. त्याच्या आधीच सरकार आरक्षण देईल. कारण, त्यांनी वेळ घेतला आहे. आणि इतक्या मोठा समाजाच्या नजरेतून पडणं सरकारला परवडणार नाही.'

आंदोलन शांततेतच होईल. त्यात काही दुमत नाही. कारण, उग्र आंदोलनाचं आम्ही समर्थन करत नाही. या शांततेच्या आंदोलनामुळे आम्ही इथपर्यंत आलो आहोत. त्यामुळे शांततेचे आंदोलनच मराठा समाजाला न्याय मिळवून देणार आहे. मराठा समाजाचं नुकसान करायचं नाही. त्यामुळे शांततेच्या मार्गानेच आरक्षण मिळवायचं आहे, असं जरांगे पाटील म्हणाले.

मराठा समाज ९५ टक्के मागास आहे. या सामान्य लोकांचा मला पाठिंबा आहे. कुणबी प्रमाणपत्र हा आमचा अधिकार आहे. आम्हाला कायमचा निकाल हवा आहे. आता आकडेमोड करुन चालणार आहे. सरकारनं आता नाटकं बंद करावं. आरक्षण मिळाल्यानंतर समाज मुख्य प्रवाहात येईल. सरकारने आता चाळे बंद करावेत आणि अंत न पाहता आरक्षण द्यावं, असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.

सुनिल कावळे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आत्महत्या केली आहे. यावर जरांगे पाटील यांनी भाष्य केलं. मी संपूर्ण महाराष्ट्राला आव्हान करतो. तुम्ही मरु नका. मी आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही. आत्महत्या हा पर्याय नाही. तुम्ही आत्महत्या केली तर आरक्षण कोणाला द्यायचं. सरकारने तातडीने या आत्महत्येची दखल घेऊन मराठा समाजाला न्याय द्यावा, असं ते म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT