Woman beaten and expelled by husband Sakal
महाराष्ट्र बातम्या

काय चाललंय सोलापूर जिल्ह्यात! माहेरील प्रॉपर्टीचा हक्क का सोडला? म्हणत पतीकडून पत्नीचा छळ; पैशासाठी नातवाची आजोबाला मारहाण; सासू, नणंदेकडून विवाहितेस मारहाण

माहेरील प्रॉपर्टीचा हक्क का सोडला, तुझ्या हक्काचा हिस्सा माग, नाहीतर तुझ्या भावाला मारून टाकतो, अशी धमकी देऊन पतीने त्याच्या पत्नीला मारहाण केल्याची घटना विजयपूर रोडवरील भगवत हौसिंग सोसायटीत घडली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : माहेरील प्रॉपर्टीचा हक्क का सोडला, तुझ्या हक्काचा हिस्सा माग, नाहीतर तुझ्या भावाला मारून टाकतो, अशी धमकी देऊन पतीने त्याच्या पत्नीला मारहाण केल्याची घटना विजयपूर रोडवरील भगवत हौसिंग सोसायटीत घडली आहे. ५ मे २०२१ रोजी शौर्या हिचा विवाह जुळे सोलापुरातील रुबी नगर येथील सिद्धेश संजय पाटील याच्यासोबत झाला होता. विवाहानंतर काही दिवसांनी त्याने वारंवार तुझ्या घरच्यांनी विवाहात मानपान केला नाही म्हणून छळ सुरू केला. त्यानंतर माहेरील प्रॉपर्टीचा हक्क का सोडला म्हणूनही त्याने शिवीगाळ, दमदाटी केली. दारू पिऊन पती सिद्धेश याने शारीरिक व मानसिक छळ केला, अशी फिर्याद शौर्या पाटील यांनी विजापूर नाका पोलिसांत दिली आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार सोनार हे करीत आहेत.

मोबाईल घरी ठेवून तरुणी पसार

सोलापूर : शाळा सोडून दोन वर्षांपासून घरीच असलेली भारतरत्न इंदिरा नगरातील १९ वर्षीय तरुणी बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घरातून निघून गेली आहे. त्यानंतर ती पुन्हा घरी आलीच नाही म्हणून चिंतेतील तिच्या आईने सदर बझार पोलिसांत धाव घेतली आहे. स्वत:कडील मोबाईल घरात ठेवून बुधवारी तरूणीने घर सोडले. जाताना घरातील कोणाला काहीही सांगितले नाही. तिच्या पालकांनी इतरत्र शोध घेतला, नातेवाईकांकडे विचारपूस केली. मात्र, ती सापडली नाही. त्यानंतर तिच्या आईने सदर बझार पोलिस ठाणे गाठले. १९ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची पोलिसांत फिर्याद दाखल झाली असून पोलिस उपनिरीक्षक अतुल बनकर तपास करीत आहेत.

----------------------------------------------------------------------

पैशासाठी नातवाकडून आजोबाला मारहाण

सोलापूर : नातू शाम शिवाजी पाटोळे (रा. आकुंभे, ता. माढा) याने घरी येऊन विवाहासाठी जमीन विकून पैसे देण्याची मागणी केली. त्यावेळी आजोबा विठ्ठल निवृत्ती पाटोळे (वय ९२) यांनी जमीन विकायला नकार दिला. त्यानंतर चिडलेल्या नातवाने आजोबाला शिवीगाळ करून काठीने मारहाण केली. मुलगा शिवाजी भांडण सोडवायला आल्यावर नातू शाम याने त्यालाही शिवीगाळ करून मारहाण केली, अशी फिर्याद विठ्ठल पाटोळे यांनी टेंभुर्णी पोलिसांत दिली. पोलिस हवालदार पवार तपास करीत आहेत.

------------------------------------------------------------------------------

सासू, नणंदेकडून विवाहितेस मारहाण

सोलापूर : सासू मीरा दत्तात्रय गायकवाड व नणंद पल्लवी नितीन गवळी (दोघीही रा. वडाळा, ता. उत्तर सोलापूर) यांनी शिवीगाळ व मारहाण केल्याची फिर्याद विवाहिता तृप्ती भारत गायकवाड यांनी सोलापूर तालुका पोलिसांत दिली आहे. सासूने घरकामाच्या कारणातून शिवीगाळ केली तर नणंद पल्लवीने घरातील चाकूने हातावर वार केले. भांडणानंतर आई-वडील सासरी आल्यावर सासू व नणंद या दोघींनी त्यांनाही शिवीगाळ, दमदाटी केली. त्यावेळी भांडणात आईच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटून पडले, असेही फिर्यादीत नमूद आहे. पोलिस हवालदार चव्हाण तपास करीत आहेत.

-------------------------------------------------------------------------------

दुचाकीच्या धडकेत चिमुकली जखमी

सोलापूर : मंद्रुप ते औज हा घराजवळील रस्ता ओलांडताना सौंदर्या अमसिद्ध पुजारी (वय ०६) हिला दुचाकीवरून भरधाव वेगाने आलेल्या गौवसिद्ध रामा पुजारी (रा. कुरघोट, ता. दक्षिण सोलापूर) याने जोरात धडक दिली. त्यात सौंदर्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघात प्रकरणी चिमुकलीचे वडील अनसिद्ध बिरप्पा पुजारी यांनी मंद्रुप पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यावरुन दुचाकीस्वार गौवसिद्ध पुजारीविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिस हवालदार गुरव तपास करीत आहेत.

---------------------------------------------------------------------------------

एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

सोलापूर : रस्त्याच्या विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या बसने (एमएच ०८, एपी ६१६०) समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरात धडक दिली. त्यात दुचाकीवरील मंगेश भारत कांबळे हा गंभीर जखमी होऊन मयत झाला. दुचाकीवर मागे बसलेला दिपक भागवत गायकवाड हा जखमी झाल्याची फिर्याद मयताचा चुलत भाऊ श्रीकांत शत्रुघ्न कांबळे (रा. बोरगाव, ता. पंढरपूर) यांनी सांगोला पोलिसांत दिली. दरम्यान, मयत मंगेश व दिपक हे दोघे २५ मे रोजी दुपारी अडीचच्या सुमारास बाजार संपल्यावर घराकडे निघाले होते. त्यावेळी मांजरी गावच्या हद्दीत सांगोला ते पंढरपूर रोडवर हा अपघात झाला, असेही फिर्यादीत नमूद आहे. त्यावरून बस चालक बालाजी वैजनाथ मडुळे (रा. रत्नागिरी) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक भातुंगडे तपास करीत आहेत.

--------------------------------------------------------------------------------------

हॅण्डल लॉक तोडून दुचाकीची चोरी

सोलापूर : हॅण्डल लॉक करून लावलेली दुचाकी (एमएच १३, एआर २७४३) चोरट्याने लॉक तोडून चोरून नेल्याची फिर्याद व्यंकटेश चंद्रशेखर जक्कन (रा. रविवार पेठ) यांनी जोडभावी पेठ पोलिसांत दिली. रविराज बारसमोरील बोळात लावलेली दुचाकी चोरट्याने चोरून नेल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिस हवालदार साळुंखे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut announcement: संजय राऊतांची मोठी घोषणा!, ठाकरे बंधू मुंबईसह ‘या’ महापालिका निवडणूक एकत्र लढवणार

Kangana Ranaut Marriage : मिस्ट्री मॅन, गुपचूप लग्न अन् आयुष्यात...; कंगना राणौतचा धक्कादायक खुलासा, म्हणाली प्रेमात सगळं...

Jitendra Awhad: आझादीमध्ये राहू द्या; स्वातंत्र्य दिनी मांस विक्री बंदीवरून जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर हल्लाबोल

Santosh Bangar Vs Gajanan Ghuge: वाकयुद्ध रंगलं, महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता | Politics | Sakal News

WAR 2 REVIEW: बेस्ट की पैसे वेस्ट? कसा आहे ह्रितिक रोशन आणि एनटीआरचा 'वॉर २' ; वाचा रिव्ह्यू

SCROLL FOR NEXT