Eknath Shinde vs Uddhav Thackeray sakal
महाराष्ट्र बातम्या

'धनुष्यबाण' गोठवल्यास पुढे काय, दसरा मेळाव्यात ठरणार दिशा! ३२०० बसगाड्या बुकिंग

शिवसेना कोणाची याचा निर्णय आता राज्य निवडणूक आयोग घेणार आहे. त्यात बहुमताचा विचार होऊ शकतो, असे जाणकरांचे मत आहे. भाजप, काँग्रेसमधील बंडखोरीनंतर यापूर्वी त्यांचेही अनेकदा चिन्ह गोठवण्यात आले होते. तरीपण, त्यांनी नव्या चिन्हावर नवी उभारी घेतल्याची उदाहरणे आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याचा मार्ग मोकळा झाल्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेतून शक्तीप्रदर्शनाची तयारी केली जात आहे. संपर्कप्रमुखांच्या माध्यमातून जिल्हाप्रमुख गर्दी जमविण्याची जुळवाजुळव करू लागले आहेत. त्यासाठी गावोगावी बैठकांचा सपाटा सुरु आहे. दरम्यान, मुंबईला मेळाव्यासाठी येण्याकरिता शिंदे गटाकडून अठराशे बसगाड्या तर ठाकरे गटाने जवळपास चौदाशे बसगाड्यांसह काही रेल्वे गाड्यांचेही बुकिंग केले आहे.

महाविकास आघाडीतून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील ४० आमदारांनी पक्षप्रमुखांनाच आव्हान दिले. या बंडखोरीला ठाकरे यांनी गद्दारी संबोधले आहे. पण, आम्ही गद्दारी नाही तर उठाव केला, असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ठाकरे की शिंदे गट बाजी मारणार, यावर सर्वांचेच लक्ष असणार आहे. तत्पूर्वी, खरी शिवसेना कोणाची, शिंदे गटाने गद्दारी केली की नाही, हे पटवून देण्यासाठी दसरा मेळाव्यातील गर्दी महत्त्वाची मानली जात आहे. दुसरीकडे आमचा उठाव बरोबरच होता हे दाखविण्यासाठी शिंदे गटाच्या मेळाव्याला मोठी गर्दी अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर दोघांनीही गर्दी जमविण्यासाठी जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुखांना गावोगावी बैठका घेऊन कार्यकर्त्यांना, शिवसैनिकांना मंगळवारी (ता. ४) रात्री मुंबईला नेण्याची तयारी सुरु केली आहे. या मेळाव्याला येणाऱ्यांना एक रुपयादेखील खर्च करायला लागू नये, अशी व्यवस्था दोन्ही गटांनी केल्याचेही बोलले जात आहे. चिन्ह गोठल्यास पुढे काय, याचीही दिशा या दसरा मेळाव्यात ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या मेळाव्यात शिंदे गटाला भाजपचीही साथ मिळेल, असेही बोलले जात आहे. दोन्ही गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन होणार असल्याने त्यादिवशी मुंबईत पोलिसांचा मोठा बंदोबस्त असणार आहे.

प्रत्येक शिवसैनिक धनुष्यबाण आहे

सोलापूर जिल्ह्यातून जवळपास २५ हजार शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर जमतील, असा विश्वास आहे. जिल्हाप्रमुखांनी त्यासंबंधीच्या बैठका घेतल्या आहेत. उत्सफूर्तपणे खेड्यापाड्यातील सुमारे दीड ते दोन लाख शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी येतील.

- अनिल कोकीळ, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमख, शिवसेना

चिन्ह गोठल्यावर पुढे काय, दिशा ठरणार

शिवसेना कोणाची याचा निर्णय आता राज्य निवडणूक आयोग घेणार आहे. त्यात बहुमताचा विचार होऊ शकतो, असे जाणकरांचे मत आहे. भाजप, काँग्रेसमधील बंडखोरीनंतर यापूर्वी त्यांचेही अनेकदा चिन्ह गोठवण्यात आले होते. तरीपण, त्यांनी नव्या चिन्हावर नवी उभारी घेतल्याची उदाहरणे आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठल्यास पुढे काय, याची दिशा दसरा मेळाव्यातून स्पष्ट होईल. प्रत्येक शिवसैनिक धनुष्यबाण असून त्यांच्या ह्दयात पक्षप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे आहेत. त्यामुळे चिन्ह गोठले तरीदेखील शिवसेना पुन्हा नव्याने उभारी घेईल, असा विश्वास संपर्कप्रमुखांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO: आता नोकरी बदलली तरी पीएफची चिंता नाही! PF आपोआप ट्रान्सफर होणार; पण कसा? वाचा ईपीएफओचा मोठा निर्णय

IND vs SA, 3rd T20I: अभिषेक शर्मा बरसला, शुभमन गिलनेही दिली साथ; टीम इंडियाची दणदणीत विजयासह मालिकेत आघाडी

गोतस्करी करणारी वाहने स्क्रॅप करावीत! आमदार कोठे यांची अधिवेशनात मागणी; सोलापुरात पुढच्या शैक्षणिक वर्षात सुरु होणार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय

IND vs SA, T20I: जसप्रीत बुमराह अचानक घरी गेला, पुढच्या दोन टी२० सामन्यात खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट

३० हजार फूट उंचीवर मृत्यूशी झुंज! इंडिगो विमानात घडलेला तो थरारक क्षण! कोल्हापूरकर डॉक्टर बनल्या 'देवदूत'

SCROLL FOR NEXT