Human Rights Sakal
महाराष्ट्र बातम्या

कोठे गेली माणुसकी? प्रॉपर्टीसाठी नातवाने आजीला संपवले; प्रेमविवाहासाठी मुलीनेच आखला वडिलांना मारण्याचा कट, पैशांसाठी मित्राकडून मित्राचा खून

बालपणी शाळेत ‘खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे’ ही प्रार्थना म्हणणारे अनेकजण पैसा, प्रॉपर्टीसाठी रक्तातील नात्यातच विश्वासघात करीत आहेत. लऊळमध्ये नातवाने शेतीसाठी आजीलाच पेटविले तर प्रेमाविवाहाला नकार देणाऱ्या बापाला मुलीनेच संपविण्याचा कट रचल्याची घटना बार्शीत घडली.

तात्या लांडगे

सोलापूर : बालपणी शाळेत ‘खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे’ ही प्रार्थना म्हणणारे अनेकजण आता पैसा, प्रॉपर्टीसाठी रक्तातील नात्यातच विश्वासघात करीत आहेत. लऊळमध्ये नातवाने शेतीसाठी आजीलाच पेटविले तर प्रेमाविवाहाला नकार देणाऱ्या बापाला मुलीनेच संपविण्याचा कट रचल्याची घटना बार्शीत घडली. सांगोल्यात पैशांसाठी एकाने जीवलग मित्रालाच संपविले. पहिलीत शिकणाऱ्या खंडाळीतील (वेळापूर) आदिती चौगुलेचा कॅनॉलमध्ये मृतदेह आढळला. आठवड्यातील या घटनांमधून माणुसकीचा झरा आटला की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पेरणीच्या निमित्ताने पुण्यात राहणारा नातू हर्षद शिंदे हा लऊळ (ता. माढा) या गावी आला. वडिलोपार्जित शेती आजी शांताबाईच्या नावावर होती. शेतातील उत्पन्नही ती मुलीलाच द्यायची. आजी थकली आहे, आता तर जमीन आपल्या नावावर करेल, असा विश्वास नातू हर्षदला होता. पण, आजीने त्यास नकार दिला. त्यावेळी ज्याच्या बापासाठी ज्या आईने रक्ताचे पाणी केले, वेळप्रसंगी स्वत: उपाशीपोटी झोपली पण मुलाला पोटभर खायला दिले. त्या मुलाच्या मुलाने (नातू) डिझेल आजीच्या अंगावर ओतून उसाच्या ओडाशाला नेऊन आजीला पेटवून दिले. दुसरीकडे माढ्यातील एका तरूणासोबत महेंद्र शहा यांच्या मुलीचे प्रेमसंबंध होते. पण, ऐन तारूण्यात आलेल्या मुलीला समजावून सांगत शहा यांनी त्यांच्या प्रेमसंबंधाला नकार दिला. हट्टाला पेटलेल्या मुलीने आपल्या प्रेमविवाहाला बापाचाच विरोध असल्याने त्यांनाच वाटेतून बाजूला करण्याचा डाव आखला.

बालपणापासून ज्या बापाच्या अंगाखांद्यावर खेळलेल्या मुलीचे हे कृत्य माणुसकीला काळीमा फासणारेच होते. मुलीच्या काळजीपोटी बारामतीहून एसटी स्टॅण्डवर उतरलेल्या मुलीला वडिल महेंद्र शहा आणायला गेले. मुलीशी गप्पा मारत येत असताना अचानक घर आठ किलोमीटर दूर असतानाच लघुशंकेचा बहाणा करून गाडी थांबवायला सांगितली. गाडी थांबली आणि काही वेळातच काही तरूणांनी महेंद्र शहा यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. दोन्ही गुन्ह्यातील संशयित आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. सध्या संशयित आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.

द्यायचा होता मुक्कामार, पण बसला डोक्यात घाव

‘एमबीए’चे शिक्षण घेणारी लाडकी मुलगी वडिलांच्या व्यवसायात मदत करीत होती. प्रेमविवाहाचा तिचा हट्ट होता, पण वडिलांनी तिच्या भविष्याचा विचार करून काळीजीपोटी त्याला विरोध केला. मात्र, तिने त्यांनाच वाटेतून बाजूला सारण्याचा कट रचला. पोलिसांनी त्याचा छडा लावलाच, पण मुलीने रचलेल्या कटाप्रमाणे वडिलांना मुक्कामार द्यायचा होता. पण, चार-पाच जणांच्या हल्ल्यात एकाचा घाव महेंद्र शहा यांच्या डोक्यातच बसला आणि त्यांची प्रकृती चिंताजनक झाली.

निलंबीत ‘एपीआय’चा निर्घृण खून

मूळचे मंगळवेढ्याचे असलेले निलंबीत सहायक पोलिस निरीक्षक सूरज विष्णू चंदनशिवे हे गावी आले होते. जेवणानंतर शतपावली करायला गेल्यावर काही तरूणांनी त्यांचा निर्घृण खून केला. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे कसून चौकशी केली जात आहे. पैशांसाठी की अन्य कोणत्या कारणासाठी खून केला, हे काही दिवसांत स्पष्ट होईल, असा विश्वास ग्रामीण पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरण! संशयित आरोपी मनीषा मुसळे माने यांचा दोषमुक्त करण्याचा न्यायालयाकडे अर्ज, अर्जात नेमके काय? वाचा...

Thane Traffic: घोडबंदर मार्ग 6 तास पाण्याखाली, चालकांचा वाहतूक कोंडीसोबत सामना; ठाणेकरांचे हाल

Uruli Kanchan Crime : विनयभंग करत महिलेला जातिवाचक शिवीगाळ; खासगी सावकारावर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Updates: अमळनेरात पुराचा कहर; एकाचा मृत्यू, २४ तासांनंतरही शोध निष्फळ

Mumbai News: मुंबईत घर घेणं महागलं! नागरिकांच्या खिशाला फटका, 'इतक्या' टक्क्यांनी किमतीत वाढ, अहवाल समोर

SCROLL FOR NEXT