whiskey  Whiskey
महाराष्ट्र बातम्या

राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात व्हिस्की, स्कॉचचे दर सर्वाधिक

आघाडीचे विदेशी ब्रँड महागडे असल्याने राज्यात हे मद्य पिणाऱ्यांची संख्या फार कमी आहे

राजेश रामपूरकर

नागपूर : विदेशी मद्यावरील उत्पादन शुल्कात ५० टक्के कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे नववर्षापूर्वीच व्हिस्की (Whiskey), स्कॉचचे (Scotch) दर घसरणार असल्याची भेट मिळाली आहे. मात्र, अद्यापही उत्पादन कंपन्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला आपले दर सादर केलेले नसल्याने मद्य विक्रीचे दर जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे विक्रेत्यांमध्ये अद्याप संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले (Waiting for new rates) आहे. ग्राहकांकडूनही विक्रेत्यांना त्याबद्दल सतत विचारणा होत आहे.

आघाडीचे विदेशी ब्रँड महागडे असल्याने राज्यात हे मद्य पिणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. त्यामुळे क्वचित ठिकाणी हे ब्रँड राज्यातील बार किंवा शॉपमध्ये आढळून येतात. मात्र, आता उत्पादन शुल्कात ३०० टक्क्यांवरून १५० पर्यंत कपात केली आहे. यामुळे या ब्रँडच्या किमती घटणार आहे. छोटे दुकानदार, व्यावसायिकांनासुद्धा आता हे महागडे ब्रँड विक्रीस ठेवता येणार असल्याचे दुकान मालकांचे म्हणणे आहे.

नववर्षांपूर्वीच व्हिस्की, स्कॉचचे घसरलेले दर जाहीर झाल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाचा महसूलसुद्धा वाढण्याची शक्यता दर्शविण्यात येत आहे. सध्या इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात (Highest rates in Maharashtra) व्हिस्की, स्कॉचचे दर सर्वाधिक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT