solapur zp sakal
महाराष्ट्र बातम्या

जिल्हा परिषदेतील गुणवंत कर्मचारी कोण? ‘या’ तीन कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव; सीईओंच्या बैठकीनंतर एका नावावर होणार शिक्कामोर्तब

सोलापूर जिल्हा परिषदेतील तीन कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव विभागप्रमुखांनी सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत एक नाव फायनल होवून ते विभागीय स्तरावर पाठविले जाणार आहे. २०२३-२४ या वर्षातील जिल्हा परिषदेचा गुणवंत कर्मचारी कोण, याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील एका कर्मचाऱ्याचा दरवर्षी ग्रामविकास खात्यातर्फे गुणवंत कर्मचारी म्हणून सन्मान होतो. सोलापूर जिल्हा परिषदेतील तीन कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव विभागप्रमुखांनी सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत एक नाव फायनल होवून ते विभागीय स्तरावर पाठविले जाणार आहे. २०२३-२४ या वर्षातील जिल्हा परिषदेचा गुणवंत कर्मचारी कोण, याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणे व इतर कर्मचाऱ्यांना प्रेरणा मिळावी या हेतूने दरवर्षी प्रत्येक जिल्हा परिषदेतील एका गुणवंत कर्मचाऱ्याचा ग्रामविकास खात्याकडून राज्य स्तरावर सन्मान केला जातो. ग्रामविकास विभागाने नुकतेच त्यासंबंधीचे प्रस्ताव तातडीने सादर करण्यासंदर्भात जिल्हा परिषदांना कळविले आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडे तीन जणांचे प्रस्ताव आले आहेत. त्यातून एकाची निवड सीईओंच्या बैठकीत होईल. पण, काही कर्मचाऱ्यांचे नाव गुणवंत कर्मचारी म्हणून घेण्यासाठी लोकप्रतिनिधींनी देखील काही अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्याचे बोलले जात आहे. शिक्षण, ग्रामपंचायत, बांधकाम, महिला व बालकल्याण, वित्त व लेखा विभाग, अशा विभागांमध्ये काही कर्मचाऱ्यांच्या कामाचे सर्वत्रच कौतूक होते. आता सामान्य प्रशासनाकडील तीन प्रस्तावात त्या विभागाचे कर्मचारी आहेत का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कर्मचाऱ्यांच्या बदल्या आचारसंहितेनंतर

जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या मार्चनंतर अपेक्षित आहेत. पण, अजून शासनाकडून त्यासंबंधीचा कोणताही पत्रव्यवहार झालेला नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी की आचारसंहितेनंतर जिल्हा परिषदेत एकाच टेबलावर अनेक वर्षे काम केलेल्यांच्या बदल्या होणार, हे अस्पष्ट आहे. तरीपण, आचारसंहितेनंतरच बदल्या होतील, अशी शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या परीक्षा लांबणीवर

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या शासनामार्फत घेतली जाणारी परीक्षा येत्या शनिवार, रविवार होणार आहे. त्यानंतर पुढील आठवड्यात कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा आहेत. मार्चच्या पहिल्याच आठवड्यात आचारसंहितेची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढावी, ज्ञानात भर पडावी या हेतूने सीईओंच्या पुढाकारातून होणारी लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या लेखी परीक्षेची तारीख अजून निश्चित झालेली नाही. थोडा वेळ होईल पण परीक्षा होणारच, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT