Amit Shah esakal
महाराष्ट्र बातम्या

Amit Shah: शरद पवार सरदार तर अजितदादा कोण? बच्चू कडूंचा सवाल; म्हणाले, अंगलट...

Bachchu Kadu : अमित शहांनी शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या टीकेवर बच्चू कडू यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, शरद पवार जर भ्रष्टाचाराचे सरदार असतील तर मग अजितदादा कोण आहेत? अमित शाह यांच्या तोंडातून चुकीने ते शब्द निघाले असतील, ते विसरभोळे आहेत.. बऱ्याचदा अमित शाह चुकीचे बोलतात मग नंतर त्यांच्या ते अंगलट येतं. असं म्हणत बच्चू कडूंनी शाहांना कोपरखळ्या मारल्या.

संतोष कानडे

अमरावतीः भारतीय जनता पक्षाचं अधिवेशन पुण्यात संपन्न झालं. या अधिवेशनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची उपस्थिती होती. यावेळी अमित शाहांनी बोलताना, शरद पवारांना 'भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार' असा उल्लेख केला होता. त्याला उत्तर देताना बच्चू कडू यांनी कोपरखळी मारली आहे.

काय म्हणाले अमित शाह?

शरद पवार हे भ्रष्टाचारावर बोलत आहेत, भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा सरदार भारताच्या राजकारणात कोण असेल तर ते शरद पवार आहेत.. याबद्दल माझ्या मनात कसलीच शंका नाही. तुम्ही आमच्यावर काय आरोप करताय? देशातल्या कोणत्याही सरकारच्या काळात भ्रष्टाचाराला संस्थात्मक पद्धतीने करण्याचे काम कोणी केलं असेल तर ते शरद पवार तुम्ही केलं आहे. मी 'डंके की चोट पर' हे सांगतो. तुम्ही आमच्यावर आरोप करत आहात. तुमचं खोटं इथं चालणार नाही, घरोघरी जावून या खोट्याबद्दल माहिती द्यायची आहे असेही शहा यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

बच्चू कडूंच्या कोपरळ्या

अमित शहांनी शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या टीकेवर बच्चू कडू यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, शरद पवार जर भ्रष्टाचाराचे सरदार असतील तर मग अजितदादा कोण आहेत? अमित शाह यांच्या तोंडातून चुकीने ते शब्द निघाले असतील, ते विसरभोळे आहेत.. बऱ्याचदा अमित शाह चुकीचे बोलतात मग नंतर त्यांच्या ते अंगलट येतं. असं म्हणत बच्चू कडूंनी शाहांना कोपरखळ्या मारल्या.

दरम्यान, शरद पवारांवर टीका करताना अमित शाह पुढे म्हणाले की, जे आज महाराष्ट्राच्या विकासावर बोलत आहेत, आज मी त्यांना विचारतो, दहा वर्ष महाराष्ट्रात तुमचे सरकार होते. केंद्रातदेखील तुमचे सरकार होते तुम्ही महाराष्ट्राला काय दिलं? हिशोब द्या? खोट्या आश्वासनाशिवाय काही दिलं नाही. युपीए सरकारच्या काळात महाराष्ट्राला फक्त एक लाख ९१ हजार कोटी मिळाले होते. नरेंद्र मोदींनी दहा वर्षात १० लाख पाच हजार कोटी रुपये महाराष्ट्राला दिले आहेत. पवार साहेब हिशोबावर विश्वास नसेल तर पुण्यातील कोणताही चौक निवडा आमचे मुरलीधर मोहोळ हिशोब घेऊन उभे राहतील, असेही अमित शाह म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भोर तालुक्यात होणारा संभाव्य अनर्थ भोर पोलिसांनी टाळला

IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक शतक, ८० वर्षात कोणालाही न जमलेला केला पराक्रम! पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व

Skincare Tips: चेहऱ्यासाठी प्रत्येक वेळी घरगुती उपाय नसतात फायदेशीर! जाणून घ्या त्वचातज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला...

SCROLL FOR NEXT