एससी-एसटी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला विरोध करण्यासाठी देशातील काही संघटनांनी पुकारलेल्या 'भारत बंद'च्या समर्थनार्थ लोक रस्त्यावर उतरल्याने बुधवारी बिहारची राजधानी पाटणामध्ये पोलिसांनी लाठीचार्ज केला.
दरम्यान, पाटणा येथील डाक बंगला चौकात पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. त्यानंतर गर्दी इकडे तिकडे धावू लागली.
दरम्यान, पोलीस हा लाठीचार्ज करताना पटणाचे उपविभागीय दंडाधिकारीही (SDM) तिथे उपस्थित होत. यावेळी एका पोलिसाची काठी उपविभागीय दंडाधिकारी श्रीकांत खांडेकर यांनाही लागली. त्यानंतर संतापलेल्या खांडेकरांनी, मी अधिकारी असल्याचे पोलिसाला सांगितले. इतकेच नव्हे तर काही सहकाऱ्यांनी पोलिसाला त्याची चूक निदर्शनास आणून दिली. (who is Shrikant Kundalik Khandekar)
दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. असे असले तरी व्हिडिओमध्ये दिसणारे पाटणाचे उपविभागीय दंडाधिकारीही श्रीकांत कुंडलिक खांडेकर हे महाराष्ट्रातील मंगळवेढ्याचे सुपुत्र आहेत. त्यांचा आजचा व्हिडिओ व्हायरल होत असल्यामुळे त्यांच्याविषयी देशभरात चर्चा होत आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर श्रीकांत कुंडलिक खांडेकर यांच्याविषयी लोक इंटरनेवर ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर त्यांच्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
श्रीकांत खांडेकर यांचे मूळ गाव मंगळवेढ्यातील बावची हे आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. त्यानंतर त्यांनी सोलापूरातून बारावीचे शिक्षण पूर्ण केली. बारावीत चांगले गुण मिळवल्यानंतर त्यांनी दापोलीतील कृषी विद्यापीठात एग्री इंजीनिअरिंगची पदवी मिळवली.
लहाणपणापासून अभ्यासात गती असलेल्या श्रीकांत यांनी दरम्यानच्या काळात आयआयटीची प्रवेश परीक्षा देत तिथेही प्रवेश मिळवला होता. मात्र, त्यांनी आयआयटीत न जाता स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांनी यूपीएससी पास केली. खांडेकर यांनी त्यावेळी देशात 33वा क्रमांक पटकावला होता.
श्रीकांत खांडेकर हे 2020 तुकडीचे IAS अधिकारी आहेत. त्यावेळी त्यांची बिहारमधील नालंदा येथे सहाय्यक जिल्हाधिकारी (प्रशिक्षण अंतर्गत) या पदावर नियुक्ती झाली होती. सध्या ते पाटणा येथे उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) पदावर कार्यरत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.