महाराष्ट्र

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात?

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई- परिवर्तन यात्रेदरम्यान राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुकांची अनेकांची नावे सामोर येताना दिसत आहेत. प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक म्हणून अजित यशवंतराव, रविकांत वरपे व सुरज चव्हाण, मेहबूब शेख यांची नावे या शर्यतीत दिसत आहेत. 

यामध्ये अजित यशवंतराव हे सध्या प्रदेशचे चिटणीस म्हणून काम बघत आहेत तर रविकांत वरवे हे मूळचे शिरूरचे असून ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून काम बघत आहेत, या चर्चेतील असणारे तिसरे नाव हे सुरज चव्हाण असून ते मूळचे लातूर जिल्ह्यातील आहेत. ते राष्ट्रवादी युवकमध्ये समन्वयक म्हणून काम बघत आहेत. याचबरोबर बीडचे मेहबूब शेख यांचेही नाव चर्चेत आहे. 

या शर्यतीत सध्या कोकणातील राष्ट्रवादीचा चेहरा असणारे अजित यशवंतराव यांचे नाव आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. अजित यशवंतराव यांच्याकडे कोकणातील राष्ट्रवादीचा युवा चेहरा म्हणून बघितले जात आहे. यशवंतराव यांनी कोकणातील युवकांना बरोबरीला घेवून पर्यावरणाला घातक असणाऱ्या रिफायनरी प्रकल्पांविरोधात आंदोलने उभारली आहेत.

अजित यशवंतराव, रवी वरपे यांच्यासोबतच नेत्यांच्या मुलामध्ये माजी आमदार राजन पाटील यांचा मुलगा अजिंक्य राणा पाटील आणि आमदार भास्कर जाधव यांचा मुलगा विक्रांत जाधव यांचेही नाव चर्चेत आहे. मात्र, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ नेत्यांच्या पुत्राच्या की सामान्य कार्यकर्त्याच्या गळ्यात पडणार हे पाहणे आता औत्सु्कयाचे ठरले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT