Ashok Chavan esakal
महाराष्ट्र बातम्या

अशोक चव्हाण भाजपत जाणार का? स्वत: दिलं स्पष्टीकरण; म्हणाले...

नांदेडचे भाजपचे खासदार प्रताप चिखलीकर यांनी चव्हाणांचं कौतुक करत त्यांच्या भाजप प्रवेशाचे संकेत दिले होते.

सकाळ डिजिटल टीम

नांदेड : माजी मुख्यंमत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. या चर्चेवर अशोक चव्हाण यांनी स्वतः खुलासा केला आहे. आपण असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही, ही केवळ अफवा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. (Will Ashok Chavan join BJP gives explaination by self)

अशोक चव्हाण यांना भाजपनं ऑफर दिल्याची चर्चा तेव्हापासून सुरु झाली होती जेव्हा नांदेडचे खासदार प्रताप चिखरीलकर यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या बहुमत चाचणीनंतर अशोक चव्हाणांचं कौतुक केलं होतं. या कौतुकाचं कारण होतं, चव्हाणांची बहुमत चाचणीला दांडी मारणं. कारण अशोक चव्हाण यांनी स्वतः बहुमत चाचणीला दांडी मारणं आणि इतर चार काँग्रेस आमदारांनाही गैरहजर राहण्यास सांगणं याद्वारे त्यांनी भाजपचीच मदत केली, त्यामुळं त्यांचे आभार मानणे माझं काम आहे. त्यामुळं अशोक चव्हाण भाजपत आल्यावर त्यांचं स्वागत करु असंही चिखलीकर म्हणाले होते.

बहुमत चाचणीवेळी विधानसभेत काँग्रेसचे एकूण ११ आमदार गैरहजर राहिले होते. या सर्व आमदारांवर पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळं या कारवाई संदर्भात तसेच चिखलीकरांच्या विधानाच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण काँग्रेस सोडत भाजपत दाखल होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली.

यापार्श्वभूमीवर नांदेडमध्ये पत्रकारांनी अशोक चव्हाण यांना काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चेबाबत विचारणा केली तर त्यांनी आपण काँग्रेस सोडण्याचा कुठलाही निर्णय घेतलेला नाही, असं सांगत या चर्चांना काही अर्थ नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cabinet Decision: राज्याच्या कृषि विभागात चार पदांच्या निर्मितीस मान्यता, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील ८ मोठे निर्णय

हास्यजत्रेच्या सेटवर विराज जगतापवर संतापलेले सचिन गोस्वामी; समजावायला आलेली प्राजक्ता माळी, काय होतं कारण?

Pune Viral Video: पुण्यात गरवारे महाविद्यालयासमोर तरुणींच्या दोन गटांत तुफान हाणामारी, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : शिवसेना पक्षचिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरु

Chandrapur Midday Meal Scheme: विद्यार्थ्यांचे भोजन उधारीवर! तांदूळ-कडधान्य संपल्याने शिक्षकांसमोर प्रश्न, अडीच महिन्यानंतरही करारनामा नाही

SCROLL FOR NEXT