Eknath Khadse
Eknath Khadse Esakal
महाराष्ट्र

Eknath Khadse: पक्ष सोडल्यानंतर खडसेंची आमदारकी जाणार का? शरद पवारांनी दिलं उत्तर म्हणाले...

अंकिता खाणे (Ankita Khane)

जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षामधून भारतीय जनता पक्षात घरवापसी करण्याचा निर्णय एकनाथ खडसे यांनी घेतला आहे. पक्षांतर केल्यामुळे त्यांना विधानपरिषदेतील सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागणार अशी चर्चा होती. मात्र पक्षाचे नेते शरद पवार यांनी आपण खडसे यांची आमदारकी परत घेणार नाही, असे मत व्यक्त केले आहे.

खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना पक्षातर्फे विधानपरिषदेवर प्रतिनिधित्व देण्यात आले होते. पक्ष फुटल्यानंतर खडसे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाबरोबर होते. आता ते पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्यामुळे त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे खडसे आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार काय याकडे लक्ष होते.

या पार्श्‍वभूमीवर शरद पवार यांनी पुणे येथे पत्रकारांशी बोलताना खडसे यांची आमदारकी परत घेणार नसल्याचे स्पष्ट केले. एकदा आपण दिलेल्या गोष्टी माघारी घेत नाही असेही त्यांनी सांगितले. खडसेंच्या पक्षातंराबाबत शरद पवार म्हणाले, ‘‘त्यांच्या अनेक चौकशा सुरू झाल्या आहेत. व्यक्तिगत संपत्ती जप्त झाली आहे. दैनंदिन कुटुंब चालविणेही कठीण झाल्यामुळे ते हतबल झाले होते. त्यामुळे ‘जिथे जाणे तुम्हाला सोईस्कर होणार आहे, तेथे तुम्ही जा’ असे मी त्यांना सांगितले.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Iran Helicopter Crash : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या 'बेल 212' हेलिकॉप्टरमुळे अनेकांनी गमावलाय जीव ; जोडलं जातंय अमेरिकेच नाव

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

SCROLL FOR NEXT