school start Sakal
महाराष्ट्र बातम्या

सोमवारपासून शाळा सुरु होणार? शिक्षण विभागाचा मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव

स्थानिक प्रशासनावर याबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याचं या प्रस्तावात म्हटलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे शालेय शिक्षण विभागानं प्रस्ताव ठेवला आहे. यामध्ये येत्या सोमवारपासून शाळा सुरु करण्यात याव्यात अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. पण स्थानिक प्रशासनानं याबाबत निर्णय घेण्यात यावा असंही या प्रस्तावात म्हटलं आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. (Will school start from next Monday Education department proposal to Chief Minister)

गायकवाड म्हणाल्या, "पालक, शिक्षणतज्ज्ञ आणि समाजमाध्याद्वारे अनेकांकडून शाळा सुरु करण्याची मोठ्या प्रमाणावर मागणी आमच्याकडे येत होती. त्यामुळं या काळात आम्ही अनेक स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यानंतर असा निर्णय घेण्यात आला की, ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी असेल अशा स्थानिक पातळीवरील सीईओ, कलेक्टर किंवा आयुक्तांना शाळा सुरु करण्याचे अधिकार देण्यात यावेत आणि त्यांच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात यावा. त्यानुसार याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात आला आहे.

एसओपीजचाही असेल अंतर्भाव

या प्रस्तावात शाळा सुरु करण्यासंदर्भातील एसओपीज देखील सांगितल्या आहेत. शाळा स्तरावर १५ ते १८ वयोगटातील लसीकरण मोठ्या प्रमाणावर करावं, त्याचबरोबर शिक्षण आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनाही लसीकरण बंधनकारक करावं, या गोष्टींचा यामध्ये समावेश आहे, असंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

AI Dictionary : एआयची 'ही' डिक्शनरी तुम्हाला बनवून टाकेल टेक-गुरु, जगभर का आहे ट्रेंडिंग? पाहा एका क्लिकवर

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

SCROLL FOR NEXT