ncp  esakal
महाराष्ट्र बातम्या

राष्ट्रवादीलाही खिंडार पडणार? शिंदे गटातील मंत्र्याचं सूचक विधान

आमचं १७० चं बहुमत आहे, ते १८०-१८५ होईल

सकाळ डिजिटल टीम

राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि शिंदे गटातील नेते शंभुराज देसाई यांनी राष्ट्रवादीतील आमदारांबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. अजित पवारांच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी एका वृत्त वाहिनीवर सांगितलं की, "राष्ट्रवादीचे अनेक आमदार शिंदे गटाच्या संपर्कात आहे. अजित पवार आपल्या आमदारांना थोपवण्यासाठी अशी वक्तव्य करत असतात. त्यांना पण माहित आहे की, आमचं बहुमत कमी होणार नाही, उलट वाढत जाणार आहे" देसाईंच्या या विधानामुळे राजकीय चर्चांना उधान आलं.

आमचं १७० चं बहुमत आहे, ते १८०-१८५ होईल हे सुध्दा अजित पवारांना माहित आहे. अजित पवारांच्या आशा वक्तव्याला आम्ही महत्त्व देत नाही असं देसाई म्हणाले आहेत.

अजित पवारांनी काय टीका केली होती

जोपर्यंत आमदारांचं संख्याबळ १४५ आहे, तोपर्यंत सरकार चालणारच. मात्र मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतर हे कळेल. ज्या आमदारांना सोबत घेतलं, त्यांना दिलेल्या आश्वासनाबाबत आता अस्वस्थता सुरू झाली आहे. त्यामुळे थोडं थांबायला हवं.

योग्य वेळ येण्याची वाट पाहतोय. दरम्यान महाराष्ट्रात जे सुरू आहे ते लोकशाहीला घातक आहे. अशा पद्धतीने फोडाफोडीचं राजकारण झालं तर स्थिरता राहणार नाही. अशा प्रकारचे पायंडे महाराष्ट्राला आणि देशालाही परवडणार नाही. हे सर्व शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते. शिवाय शिवसैनिकांनाही हे आवडलेलं नाही, असंही अजित पवार यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता शिवसेनेला बंडाचा मोठा फटका बसला आहे, त्याच्यानंतर आता राष्ट्रवादीला देखील बसणार का पाहवं लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: 500 च्या जळलेल्या नोटा कुणाच्या होत्या? Justice Yashwant Varma Cash कांडाची पूर्ण Timeline

Mumbai High Court Order : जयगड बंदरातील आमिराती गॅसवाहू जहाजाबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय; साडेनऊ कोटी भरा, नाहीतर गॅस रिकामा करा!

Pune Tunnel: पुण्यात आणखी एक बोगदा! सुतारदरा ते पाषाण भुयारी मार्गासाठी लवकरच सल्लागार नियुक्त, महापालिकेचा मोठा प्लॅन

Latest Marathi News Live Update : पुण्यात वारजे कर्वेनगर भागात पडलेल्या प्रचंड खड्डे दुरुस्ती साठी मनसे तर्फे वारजे क्षेत्रीय प्रमुखांना तुकाराम मुंडे यांची प्रतिमा भेट

Gokul Election Update : 'गोकुळ'ची बहुचर्चित प्रारूप मतदार यादी जाहीर; 4,897 संस्थांना मतदानाचा हक्क, 'इतक्या' संस्थांना बसला फटका!

SCROLL FOR NEXT