Winter Session esakal
महाराष्ट्र बातम्या

Winter Session : बुलढाण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, विरोधकांचा सभात्याग; रिक्त जागांचाही मुद्दा उचलला

राज्यातील आरोग्य यंत्रणा सलाईनवर आहे, रुग्णांचा मृत्यू होतोय. बुलढाण्यात एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्यानंतर विधानसभेत विरोधक आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं.

संतोष कानडे

नागपूरः राज्यातील आरोग्य यंत्रणा सलाईनवर आहे, रुग्णांचा मृत्यू होतोय. बुलढाण्यात एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्यानंतर विधानसभेत विरोधक आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, बुलढाण्या जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात गर्भवती महिलेला डेंग्यू झालेला असतानाही उपचार करण्यात आले नाहीत. नंतर तिला अकोल्याला हलवण्यात आलं. मात्र सायंकाळी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

''बुलढाण्याच्या रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ रुग्णालयात हजर नव्हते का? गर्भाचे ठोके येत नव्हते असं सांगितलं जातं. मग गर्भ का काढण्यात आला नाही? डॉक्टरांनी वेळीच उपचार केले असते तर महिलेचा जीव वाचला असता'' असं राजे टोपे म्हणाले.

यावेळी विजय वडेट्टीवार यांनी आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे. मंत्री अभ्यास करुन येत नाहीत.. त्यामुळे केवळ चौकशी करतो म्हणून वेळ मारुन नेली जाते, असाही आरोप त्यांनी केला.

आरोग्य विभागातील रिक्त जागांचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला. मागील अनेक वर्षांपासून नुसते आश्वासनं दिली जात आहेत. राज्याचा आरोग्य विभाग सक्षम करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. विरोधकांनी विधानसभेतून वॉक आऊट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT