jayant patil esakal
महाराष्ट्र बातम्या

Winter Session Nagpur : ''जो मंत्रालयात ठाण मांडून बसतो त्याला पैसे मिळतात'', जयंत पाटलांचे गंभीर आरोप

Winter Session Nagpur : Those who sit in the ministry get money, Jayant Patal's serious allegations

संतोष कानडे

मुंबईः यंदाचं हिवाळी अधिवेशन नागपूर येथे ७ डिसेंबरपासून सुरु होत आहे. त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत याबद्दलचा निर्णय घेण्यात आला. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले की, ७ तारखेपासून हिवाळी अधिवेशन होत असून राज्यामध्ये अनेक गंभीर प्रश्न उभे आहेत, ते सोडवले जातील अशी अपेक्षा आहे. विशेष म्हणजे आमदारांच्या निधीवाटपावरुन सत्ताधाऱ्यांकडून दुजाभाव केला जातोय.

पाटील पुढे म्हणाले, हाजीर तो वजीर अशी सध्याची परिस्थिती आहे. जो मंत्रालयात जातो ठाण मांडून बसतो तो जास्त पैसे मिळवतो. सत्ताधारी आमदारांमध्येच ही स्पर्धा असून समान निधीचं वाटप होत नाहीये. सरकारमधल्या पक्षांमध्येच असमानतेचं धोरण आहे. बाकी विरोधकांचं तर विचारायलाच नको.

''जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. सरकार याच्यावर निर्णय घेत नाहीये. जाती-जातींमध्ये तणाव निर्माण झाला आहे. त्यासाठी जनगणना आवश्यक आहे. यासह आरक्षण आणि इतर प्रश्न सरकारने सोडवणं गरजेचं आहे.'' असं म्हणत जयंत पाटलांनी अधिवेशनामध्ये मांडण्यात येणाऱ्या प्रश्नांविषयी माहिती दिली.

सात डिसेंबरला सुरू होणारे हे अधिवेशन २० तारखेपर्यंत चालणार आहे. दरम्यान या अधिवेशनाच्या कालावधीवरून विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवर यांनी नाराजी व्यक्त केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार प्रत्येकी ३००० रुपये; निधी मागणीची फाईल वित्त विभागाकडे; बालसंगोपन योजनेसाठीही मिळणार १०० कोटी

पोलिस ठाण्यात जाऊनही न्याय मिळत नाही, चिंता नको, आता प्रत्येक शनिवारी भेटणार ‘एसपी’! सोलापूर पोलिसांचे ‘न्याय संवाद’ ॲप, ‘या’ क्रमांकावर करा तक्रार

HSC Hall Ticket 2026: विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! आजपासून बारावीचे हॉल तिकीट उपलब्ध; असे करा डाउनलोड

प्रचार उद्या थांबणार! मंगळवारी रात्रीपासून उमेदवारांच्या हालचालींवर राहणार नजर; रात्री १० नंतर सोलापूर शहरातील पक्ष कार्यालये, दुकाने राहणार बंद, वाचा...

e-SIM Fraud Awareness : ई-सिम कार्डच्या नावावर फसवणूक

SCROLL FOR NEXT