Police Constable Trupti Mulik Drive Ajit Pawar Vehicle e sakal
महाराष्ट्र बातम्या

नारी शक्ती! महिला पोलिसानं केलं उपमुख्यमंत्र्यांच्या वाहनाचं सारथ्य

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Maharashtra Deputy Minister Ajit Pawar) हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या वाहनाचे सारथ्य महिला पोलिस कर्मचारी तृप्ती मुळीक (Woman Police Constable Trupti Mulik) यांनी केले. त्यामुळे अजित पवारांसह सतेज पाटील यांनी देखील या महिला कर्मचाऱ्याचं कौतुक केलं.

तृप्ती मुळीक या मूळच्या कोल्हापुरातील अंबप पाडळी गावच्या रहिवासी आहेत. त्या पोलिस कॉन्स्टेबल असून त्यांनी 23 डिसेंबर 2021 रोजी व्हीआयपी सिक्युरिटी ड्रायव्हिंगचा कोर्स पूर्ण केला आहे. गेल्या 10 वर्षांपासून महाराष्ट्र पोलीस विभागाच्या माध्यमातून त्या सेवा देत आहेत. पण, लहानपणापासून ड्रायव्हिंगची आवड असल्याने त्या सध्या सिंधुदुर्ग मोटार पोलीस परिवहन विभागामध्ये कार्यरत आहेत.

आज व्हीआयपी वाहनचा चालक म्हणून त्यांचा नोकरीचा पहिलाच दिवस होता. याचदिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना त्यांच्या गाडीचे सारथ्य करण्याची संधी तृप्ती यांना मिळाली. त्यांचे ड्रायव्हिंग कौशल्य बघून अजित पवार आणि उदय सामंतांनी कौतुक केलं. तसेच सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित तृप्ती यांचे वाहन चलाविण्याचं कौशल्य वाख्याण्याजोगं असून त्यामधून राज्यातील तरुणींना नक्कीच प्रेरणा मिळेल, असं म्हणत तृप्ती यांचे कौतुक केले. या प्रसंगामुळे माझ्या मनात माझ्या पोलिस विभागाबद्दलचा अभिमान अधिकच वाढला, असं लिहून सतेज पाटलांनी तृप्ती यांना शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT