Ajit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

अजित पवारांच्या घरातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, शरद पवारांची माहिती

सकाळ डिजिटल टीम

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit pawar) घरातील तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अजित पवारांना देखील तसे लक्षण दिसत आहेत. त्यामुळे कदाचित त्यांना कोरोनाची शक्यता असावी. त्यांच्या आता चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामुळे अजित पवार कार्यक्रमात हजर नव्हते, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले. आज बारामतीमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.

बारामतीमध्ये पवार कुटुंबीयांचा दिवाळीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी अजित पवारांसह त्यांच्या कुटुंबीयांची उपस्थिती नव्हती. त्यामुळे शरद पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी ही माहिती दिली. तसेच कोरोना संकटामध्ये राज्य सरकारने अनेक दृष्टीने महत्वाचे निर्णय घेतले. आपल्याला काही नियम पाळावे लागले. त्यामुळे राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाली आहे. यंदाच्या दिवाळीत देखील लोकांनी नियम पाळले तर आणि मास्क लावले तर कोरोना रुग्णांची संख्या वाढणार नाही. गेल्या दोन वर्षांत अनेकांचं आर्थिक नुकसान झालं आहे, असंही पवार म्हणाले.

एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा -

गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. न्यायालयाने देखील संप करण्यास मनाई केली आहे. न्यायालयाच्या आदेशाचा आदर ठेवावा आणि विषय संपवावा, असं म्हणत पवारांनी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAG Report : रेल्वे स्थानकातील पाणी पिता? CSMT, कल्याण, लोणावळ्यातही तपासणी; कॅगच्या अहवालात धक्कादायक खुलासा

Panvel-Karjat Local: आनंदाची बातमी! दीड तासाचा प्रवास ४० मिनिटांत पूर्ण; कर्जत-पनवेल लोकल कधी सुरु होणार? तारीख आली समोर

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

Marathi News Live Updates : महाडमध्ये केमिकल कंपनीत गॅस गळतीमुळे एकाचा मृत्यू, ८ गंभीर

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT