devendra fadnavis in amravati Sakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis : फडणवीसांच्या बैठकीत घुसण्याचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न; अमरावतीमध्ये गोंधळ

संतोष कानडे

अमरावतीः राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक घेत आहेत. मात्र त्यांच्या बैठकीमध्ये काही कार्यकर्त्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हे कार्यकर्ते असल्याचं सांगितलं जात आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी हे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

अमरावती येथे उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांची बैठक सुरु आहे. मराठी भाषा विद्यापीठ आणि टेक्स्टाईल पार्क यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरु असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत घुसण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांच्या समस्या आणि अमरावती जिल्हा पालकमंत्र्यांनी वाऱ्यावर सोडल्याचा आरोप उपस्थित आंदोलकांनी केलाय.

मागील दोन-तीन दिवसांपासून अवकाळी पावसामुळे गहू, टरबूज आणि संत्र्याचं नुकसान झालं आहे, अतिवृष्टीचे पैसे अजून दिले नाही आणि इतर मागण्या पूर्ण न झाल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवलं आहे. उपमुख्यमंत्री जेव्हा बाहेर येतील तेव्हा त्यांना भेटतील, असं आश्वासन आंदोलकांना देण्यात आलेलं आहे.

दरम्यान, राज्यभरात मागील दोन-तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. शेतीवर अक्षशः बर्फाचा थर जमा झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. मराठवाडा, नगर, बुलडाणा, कोल्हापूर, अमरावती या जिल्ह्यांसह अनेक भागात नुकसान झालेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs SA W:भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Omprakash Raje Nimbalkar : "१०० कोटी हवेत तर आमच्या किडन्या विकू, पण पक्षांतर करू नका"; उमरग्यातील शिवसैनिकांचे ओमप्रकाश राजेनिंबाळकरांना हृदयद्रावक पत्र

Omraje Nimbalkar: दिल्लीतून फोन; धाराशिवमध्ये घोषणा! पक्षबदलाच्या निर्णयामागे नेमके काय घडले? ओमराजेंनी प्रथमच सांगितली पडद्यामागची कथा

T20 WC, IND W vs SA W : स्मृती-शफालीची तुफान सुरुवात, पण द. आफ्रिकेने आवळले फासे; तरीही टीम इंडिया दीडशे पार

विश्वासावर प्रश्नचिन्ह, विकासाची कोंडी, सत्तेची गरज...; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील बंडखोर खासदाराने पक्ष सोडण्याची कहाणी सांगितली!

SCROLL FOR NEXT