Yashwant Jadhav Esakal
महाराष्ट्र बातम्या

यशवंत जाधव प्रकरण: कॉर्पोरेट मंत्रालयाची मुंबई पोलिसांकडे पत्राद्वारे तक्रार

यशवंत जाधव प्रकरणाला आता वेगळ वळण लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) प्रकरणात आता नवी माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट कार्य मंत्रालयाने मुंबई पोलिसांना (Mumbai Police) पत्र लिहून यशवंत जाधव प्रकरणात गुन्हा नोंदवण्यासाठी तक्रार दिली आहे. यामुळे या प्रकरणाला आता वेगळ वळण लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कॉर्पोरेट कार्य मंत्रालयाने काय लिहले पत्रात

कॉर्पोरेट कार्य मंत्रालयाने केलेल्या तक्रारीमध्ये प्रधान डिलर्ससह ६ कंपन्यांविरुद्ध तक्रार केली आहे. यामध्ये यशवंत जाधव यांच नाव नाही. मात्र, या सगळ्या कंपन्या यशवंत जाधव यांच्याशी संबंधित असल्याचे MCAने म्हंटल आहे. यशवंत जाधव यांच्याविरुद्ध सुरु असलेल्या तपासामध्ये स्कायलिंक कमर्शियल लिमिटेड आणि सुपरसॉफ्ट सप्लायर्स लि. या शेल कंपन्यात केलेले गैरव्यवहार समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर लवकरच कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.

स्कायलिंक कमर्शियल लिमिटेड आणि सुपरसॉफ्ट सप्लायर्स लि. या शेल कंपन्या कोलकाता येथील एंट्री ऑपरेटर्सनी तयार केल्या आहेत. जाधव यांच्या कुटुंबीयांना १५ कोटी रुपयांचे असुरक्षित कर्ज या कंपन्या मार्फत दिले गेले. जाधव यांच्या कुटुंबीयांकडून मिळालेल्या रोख रकमेच्या बदल्यात या कंपनीकडून असुरक्षित कर्जे दिली गेली. बहुस्तरीय व्यवहारांद्वारे लाँडरिंग केले गेल्याचे आरोप आहेत.

यशवंत जाधव काय आहे नेमके प्रकरण

मुंबई महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केली. यावेळी त्यांच्या घरातून काही मालमत्ता जप्त करण्यात आली. यशवंत जाधव स्थायी समितीचे अध्यक्ष असताना त्यानी कंत्राटामध्ये कोट्यवधीचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. यशवंत जाधव यांनी चार कंत्राटदारांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची संपत्ती आपल्या नावावर केल्याचा आरोप आहे. ही बेनामी संपत्ती असल्याचा आयकर विभागाचा दावा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Army Harassment: वरिष्ठांचा त्रास, जवानाने जीव संपवला ; लष्करी वसाहतीतील घटना, दोघांवर गुन्हा दाखल

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Asian Games: तिरंदाजीत भारताची 'गोल्डन हॅट्रिक'! महिलांपाठोपाठ पुरुष संघाचेही वर्चस्व; तर नेमबाज नीरु धंडा-कायनान चेनाईचा सुवर्णवेध

Ratnagiri Tourism : ‘थ्रीडी शो’ अन् ‘शिवसृष्टी’ तोट्यात, उत्पन्न ८ लाख तर खर्च ९ लाख; नावीन्यपूर्ण उपक्रम ठरताहेत ‘पांढरा हत्ती’

Corruption Case : पूजा खेडकरच्या वडिलांच्या घरावर छापा, कोट्यवधींची बेहिशोबी मालमता; उत्पन्नाच्या १०३ टक्के जास्त माया जमवली कशी?

SCROLL FOR NEXT