Video Viral esakal
महाराष्ट्र बातम्या

Video Viral: नको ते धाडस! पुराच्या पाण्यात बैलगाडी घातली, बैलं अन् मालक पोहून निघाले पण गाय अन् गोरा बुडाला; व्हिडीओ पाहा...

Floods News: यवतमाळ जिल्ह्यात शनिवारी सकाळपासूनच पाऊस बरसत होता. उमरी कापेश्वर जवळील नाल्याला आलेल्या पुरात गायी आणि गोऱ्या गेला वाहून गेला. बैलगाडीच्या मागे बांधून असलेल्या गायी आणि गोरा पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे.

संतोष कानडे

Yavatmal News: यवतमाळमध्ये एका शेतकऱ्याने नको ते धाडस दाखवलं आहे. नाल्याचं पाणी पुलावरुन वाहात असताना त्याने वाहात्या पाण्यात बैलगाडी घातली. त्यामुळे बैलगाडी नाल्यामध्ये वाहून गेली. दोन्ही बैलं कसेबसे पोहत-पोहत काठावर आले. गाडीवाणानेही स्वतःला वाचवलं. परंतु गाडीच्या मागे बांधलेली गाय आणि एक गोरा वाहून गेला आहे.

यवतमाळच्या उमरी कापेश्वर ते झापरवाडी दरम्यानची ही घटना आहे. नाल्याच्या पुरात गाय आणि गोरा वाहून गेल्याने शेतकऱ्याच्या नको धाडसाबद्दल चीड निर्माण होतेय.

यवतमाळ जिल्ह्यात शनिवारी सकाळपासूनच पाऊस बरसत होता. उमरी कापेश्वर जवळील नाल्याला आलेल्या पुरात गायी आणि गोऱ्या गेला वाहून गेला. बैलगाडीच्या मागे बांधून असलेल्या गायी आणि गोरा पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे.

उमरी कापेश्वर ते झापरवाडी मध्यभागी असलेल्या नाल्याच्या पुरात दोन जनावरे वाहून गेल्याने हळहळ व्यक्त होतेय. त्यानंतर ग्रामस्थांकडून जनावरांचा शोध घेतला गेला, मात्र त्यांचा कुठेही पत्ता लागला नाही. या नको त्या उपद्व्यापामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे.

अशीच घटना परवा लातूरमध्ये घडली होती. जळकोट तालुक्यातील तीरू नदीच्या पुलावरून पाणी गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर पुलावरून जातांना ट्रॅक्टर चालवण्याचा अंदाज चुकल्याने ट्रॅक्टर नदीत उतरलं. दरम्यान यावेळी जमावाने ट्रॅक्टर चालकाचा जीव वाचवला आहे. लातूर जिल्ह्यातील तिरू नदीच्या पुलावरचा हा व्हिडीओ व्हायरल होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT