accident.jpg
accident.jpg 
महाराष्ट्र

नांदेड : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरूण ठार 

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : नांदेडहून गावाकडे जाणाऱ्या एका दुचाकीस्वारास अज्ञात वाहनाची धडक बसली. यात तो जागीच ठार झाला. ही घटना नांदेड ते नायगाव रस्त्यावर असलेल्या किकी पाटीजवळ मंगळवारी (ता. १५) सकाळी घडली. 

लोहा तालुक्यातील नांदगाव येथील तरूण लक्ष्मण श्रीराम भरकडे (वय २७) हा नांदेडच्या मोगडपल्ली मेडीकल या दुकानावर कामाला होता. सोमवारी (ता. १४) रात्री दिवाळीनिमित्त दुकान साफ करण्यासाठी तो नांदेडमध्येच थांबला. 

मंगळवारी सकाळी तो आपल्या घराकडे दुचाकीवरुन जात असताना किकी पाटीजवळ त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या धडकेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो जागीच ठार झाला.

उस्माननगर पोलिसांनी घटनास्थीळ येऊन पंचनामा केला. शवविच्देनासाठी लक्ष्मण भरकडे याचा मृतदेह विष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालयात दाखल केला आहे. मयत लक्ष्मण हा घरचा एकटाच कमावता पुरूष होता. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

Pune Fire News : पुण्यात PMPL बसला आग; परिसरात वाहतूक कोंडी

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

SCROLL FOR NEXT