Chhatrapati Sambhaji Raje Sakal
महाराष्ट्र बातम्या

"राज्यपालांनी आपल्या पदाचीच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राची..." - युवराज संभाजीराजे

इतिहास, संस्कृती आणि परंपरेचा आदर असणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून नियुक्त करा अशी मागणी युवराज संभाजी छत्रपती यांनी केली आहे.

दत्ता लवांडे

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील अनेकांकडून त्यांच्यावर टीका होत आहे. त्यांची टोपी आणि त्यांच्या अंत:करणाचा रंग एकच आहे अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केली होती तर देशाच्या पंतप्रधानांनी इतिहास, संस्कृती आणि परंपरेचा आदर असणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून नियुक्ती करावी अशी मागणी युवराज संभाजी छत्रपती यांनी केली आहे.

(Yuvraj Sambhaji Chhatrapati on Governor Bhagatsingh Koshyari)

"गुजराती आणि राजस्थानी लोक मुंबईतून गेले तर मुंबईत पैसे राहणार नाही. तसेच आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे तीसुद्धा राहणार नाही" असं वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शुक्रवारी केले होते. त्यानंतर बोलताना छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, "विद्यमान राज्यपाल महोदयांची जीभ वारंवार घसरते आहे. शिवरायांबद्दलचे वक्तव्य असो, महात्मा फुले व सावित्रीबाईंबद्दल पातळी सोडून बोलणे असो अथवा मुंबई बद्दल वक्तव्य करून मराठी माणसाची अस्मिता दुखावणे असो, हे महाशय केवळ राज्यपाल पदाचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहेत."

त्यामुळे, देशाच्या राष्ट्रपती महोदया व पंतप्रधान या विषयात गांभीर्याने लक्ष घालून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेचे भान असणाऱ्या व त्याबद्दल आदर असणाऱ्या व्यक्तीची राज्यपालपदी निवड करावी अशी मागणी संभाजीराजे यांनी केली आहे.

काय आहे प्रकरण?

राज्यपालांनी एका भाषणात बोलताना मुंबईबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. "गुजराती आणि राजस्थानी लोक मुंबईतून गेले तर मुंबईत पैसे राहणार नाही. तसेच आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे तीसुद्धा राहणार नाही" असं राज्यपाल म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर त्यांना टीकेचा धनी व्हावं लागलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

Nagpur News : आई-बाबा मला माफ करा; तरुण अधिवक्‍त्याने गळफास घेऊन संपविले जीवन

Empress Garden : एम्प्रेस गार्डनच्या जागेवर न्यायालयीन बांधकामास विरोध; १३४ वर्षांचा ऐतिहासिक वारसा उद्ध्वस्त करण्याचा डाव

Gyanesh Kumar Impeachment : मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोग चालवण्याची तयारी! ज्ञानेश कुमार यांच्या अडचणीत वाढ? विरोधी पक्ष संसदेत मांडणार प्रस्ताव!

IND vs WI, Live Streaming: भारत-वेस्ट इंडिज संघात ३ वनडे अन् ५ टी२० सामन्यांचा रोमांच! कधी, कुठे अन् किती वाजता पाहाणार मॅच?

SCROLL FOR NEXT