1234 marathi movie teaser nipun dharmadhikari vaidehi parshurami SAKAL
मनोरंजन

1 2 3 4 Film: होती लव्हस्टोरी पण गडबड झाली... निपुण - वैदेहीच्या 'एक दोन तीन चार' चा धमाकेदार टिजर रिलीज

निपुण धर्माधिकारी - वैदेही परशुरामीच्या सिनेमाचा धमाकेदार टीझर बघाच

Devendra Jadhav

1 2 3 4 Movie Teaser: जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि ज्योती देशपांडे निर्मित एक नवीकोरी कथा असलेला “एक दोन तीन चार” हा चित्रपट येत्या नवीन वर्षात ५ जानेवारी २०२४ रोजी आपल्या भेटीस येत आहे.

जिओ स्टुडिओजचा बहुप्रतीक्षित 'झिम्मा २’ आज प्रदर्शित होत आहे, या मल्टिस्टारकास्ट चित्रपटासोबतच “एक दोन तीन चार“ चित्रपटाचा धमाकेदार टिजर रिलीज होत आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा डबल बोनस ठरणार हे नक्की.

या चित्रपटाचे वैशिष्टय म्हणजे ‘मुरांबा‘ या बहुचर्चित चित्रपटानंतर वरूण नार्वेकर या दिग्दर्शकाचा हा पुढील चित्रपट असणार आहे. तर या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद निपुण धर्माधिकारी आणि वरुण नार्वेकर यांनी मिळून लिहिले आहेत.

जिओ स्टुडिओजच्या या नव्या चित्रपटात कलाकारांची दमदार टीम दिसणार आहे. चित्रपटातील मध्यवर्ती पात्र असलेल्या सायलीची भूमिका वैदेही परशुरामी हिनं केली आहे तर समीरची भूमिका निपुण धर्माधिकारीनं साकारली आहे. याव्यतिरिक्त मृणाल कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, सतीश आळेकर, शैला घाणेकर, यांच्या देखील मुख्य भूमिका आहेत. यानिमित्ताने वैदेही आणि निपुण ही नवीन जोडी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. तर या चित्रपटाच्या माध्यमातून निपुण धर्माधिकारी एक मोठी मध्यवर्ती भूमिका पहिल्यांदाच साकारताना दिसणार आहे.

जिओ स्टुडिओज् बरोबर या चित्रपटाची निर्मिती रणजित गुगळे, केयूर गोडसे, निपुण धर्माधिकारी आणि नीरज बिनीवाले यांच्या बहावा एन्टरटेन्मेंट आणि 16 बाय 64 यांनी केली आहे.

आजच्या तरुण पिढीच्या आयुष्यात डोकावत प्रेम, लग्न अशा गोष्टींचा प्रवास कसा असू शकतो हे विनोदाची अचूक पेरणी करत हलक्या फुलक्या पद्धतीने या चित्रपटातून मांडण्यात आलं आहे. त्यामुळे आजच्या तरुण पिढीसोबतच सर्व वयोगटातील प्रेक्षकवर्गासाठी जिओ स्टोडिओजची ही नवं वर्षाची मनोरंजनाची खास ट्रीट ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Milk Rates: कर्नाटकात दूध उत्पादकांना प्रतिलिटर ७ रुपये जादा; महाराष्ट्रातही दूध दरवाढ होणार का? पुण्यात आज बैठक

H-1B Visa Extension : अमेरिकेत नोकरी करणाऱ्या हजारो H-1B व्हिसाधारकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; भारतीयांवर थेट परिणाम

Supriya Sule: 'माझा भाऊ गेला, त्याच दिवशी विलीनीकरणाचा विषय संपला'; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

IND vs NZ 4th ODI Live: हायव्होल्टेज ड्रामा! गुरनूर ब्रार अन् न्यूझीलंडचा फलंदाज भिडले, विराटने गोलंदाजाला मागे खेचले नाहीतर... Video Viral

Latest Marathi News Live Update : पुण्यातील झेड ब्रीज खाली फटाक्यांमुळे टेम्पोला आग

SCROLL FOR NEXT