66 Sadashiv marathi film is coming soon  
मनोरंजन

'66 सदाशिव' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

सकाळवृत्तसेवा
जाहिरात क्षेत्रातील कमर्शियल आर्टिस्ट, चित्रकार, निवेदक, संहिता लेखक, अभिनेता असे बहुआयामी व्यक्तीमत्व म्हणजे योगेश देशपांडे. काही दिवसांपूर्वी गाजलेल्या ‘ग्रहण’ या मालिकेत त्यांनी साकारलेली प्रमुख भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आता त्यांचे मराठी चित्रपट दिग्दर्शक म्हणून पदार्पण होत असून ’66 सदाशिव’ असे त्यांच्या चित्रपटाचे नाव आहे.

मुळात चित्रकार असलेल्या योगेश यांनी रेडीओ, टीव्हीसाठी जाहिरात लेखन-दिग्दर्शन केले आहे. याशिवाय पुलं, गदिमा यांच्यावरील कार्यक्रमासह विविध सांगीतिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे संहिता लेखन आणि सादरीकरण करत असताना त्यांनी अभिनयाची रुचीही जपली. त्यांनी यापूर्वी ‘अवंतिका’, पिंपळपान’, ‘रेशीमगाठी’ या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

आगामी ’66 सदाशिव’ या चित्रपटाबद्दल बोलताना योगेश देशपांडे म्हणाले, जाहिरात विश्वात बरीच वर्षे काम केल्यानंतर आता काहीतरी वेगळे करावे असे मनात होते. कॉर्पोरेट फिल्म्स, ब्रँड अॅड फिल्म्सच्या दिग्दर्शनाचा अनुभव होता यामुळे चित्रपट क्षेत्र खुणावत होते, याच दरम्यान ’66 सदाशिव’चा विषय सुचला या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन अशी चौफेर जबाबदारी सांभाळत मी अभिनय सुद्धा केला आहे. चित्रपटाचा विषय अतिशय वेगळा आहे, या चित्रपटात प्रतिभावंत, दिग्गज कलाकार दिसणार आहेत, चित्रपटाची निर्मिती ‘पुणे टॉकीज  प्रा. लि.’ यांची असून हेमंत गुजराथी, विनय वाकलकर, सौरभ चिंचणकर निर्माते आहेत. चित्रपटाचे पोस्ट प्रॉडक्शन अंतिम टप्प्यात असून चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police Controversy : अल्पवयीन आरोपीची गाडीला बांधून धिंड काढणे महागात, वादग्रस्त वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची उचलबांगडी

Chiplun ACB Action : जमिनीच्या फेरफारला मंजुरी देणं भोवलं! 5 हजारांची लाच घेताना मंडल अधिकारी जाळ्यात; कार्यालयातच ACB नं रचला सापळा

'जो करण अर्जुन में हुआ था…' सलमान खानच्या एका डायलॉगने BIGG BOSS 20 बद्दल वाढली उत्सुकता

Marathi News Live Updates : राऊतांनी पोस्ट केला शिंदेंचा फोटो, कायद्यानं खेळ आटोपतोय; राजकीय भूकंपाचे संकेत?

Khelo India Funding: खेलो इंडिया योजनेत राज्यांना प्राधान्य; केंद्र सरकारकडून क्रीडा पायाभूत सुविधांसाठी ५६५ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT