75th independence day amitabh bachchan shared video singing national anthem with specially abled childrens.
75th independence day amitabh bachchan shared video singing national anthem with specially abled childrens. Google
मनोरंजन

दिव्यांग मुलांसोबत अमिताभनी खास अंदाजात परफॉर्म केलं जन-गण-मन, पहा व्हिडीओ

प्रणाली मोरे

75th Independence Day: आज देशभरात 75 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. 75 व्या अमृत महोत्सवानिमित्तानं देशभरात वेगवेगळे कार्यक्रम सादर केले गेले. या खास दिनी सर्वसामान्यांपासून बॉलीवूड कलाकारांपर्यंत साऱ्यांनीच खास अंदाजात सेलिब्रेशन केलं. अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan),शाहरुख खान,सलमान खान,प्रियंका चोप्रा ते अक्षय कुमार साऱ्यांनीच सोशल मीडियावर त्यांनी स्वातंत्र्य दिन कसा सेलिब्रेट केला हे पोस्टच्या माध्यमातून शेअर केलं.(75th independence day amitabh bachchan shared video singing national anthem with specially abled childrens().

मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ(Video) शेअर केला आहे. व्हिडीओत अमिताभ बच्चन दिव्यांग मुलांसोबत राष्ट्रीय गीतावर परफॉर्म करताना दिसले. अमिताभ बच्चन यांनी व्हाईट कोट आणि ब्लॅक पॅंट असा पेहराव केला आहे, त्यांच्यासोबत लहान मुलही व्हाईट रंगाच्या कपड्यांमध्ये दिसत आहेत.

व्हिडीओत अमिताभ बच्चन आणि मुलं सांकेतिक भाषेत राष्ट्रीय गीत परफॉर्म करताना दिसत आहे. आणि तेव्हा बॅकग्राऊंडला जन-गण-मन हे गाणं वाजताना दिसत आहे. अमिताभ यांनी स्वातंत्र्य दिनी हा व्हिडीओ शेअर करत 'जय हिंद' लिहिले आहे. अमिताभ यांनी शेअर केलेल्या या सुंदर व्हिडीओला सगळेच पसंत करत आहेत. चाहत्यांपासून अनेक सेलिब्रिटींनी या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

अमिताभ बच्चन यांच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर ते लवकरच अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' सिनेमात दिसणार आहेत. 'ब्रह्मास्त्र' मध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट,नागार्जुन अक्किनेनी आणि मौनी रॉय मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत. हा सिनेमा ९ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. याव्यतिरिक्त 'गूडबाय' सिनेमात अमिताभ दिसतील. या सिनेमात रश्मिका मंदाना त्यांच्यासोबत काम करत आहे. आणि इतरही बरेच प्रोजेक्ट पाइपलाइनमध्ये आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Result 2024 : यंदा बारावीच्या निकालात मुलींचा डंका, महाराष्ट्रात एकूण ९३.३७ टक्के विद्यार्थी यशस्वी

MS Dhoni Injury Update : MS धोनीला नक्की झाले तरी काय... उपचारासाठी जाणार लंडनला?

Latest Marathi News Live Update: राज्याचा बारावीचा निकाल जाहीर; ९३.३७ टक्के लागला निकाल

Pune Accident: पुणे अपघात प्रकरणी कारवाईला वेग! बार मालक, मॅनेजरसह पाच जणांना अटक

Gold Loan: आरबीआयच्या कडक नियमांमुळे गोल्ड लोन घेणाऱ्यांच्या अडचणी वाढणार; आता मिळणार कमी पैसे

SCROLL FOR NEXT