83 movie 
मनोरंजन

83 trailer: भारतीय क्रिकेट संघाची विजयगाथा; पहा '83'चा जबरदस्त ट्रेलर

येत्या २४ डिसेंबर रोजी हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

स्वाती वेमूल

२५ जून १९८३ रोजी लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषकावर आपलं नाव कोरत इतिहास रचला. याच विजयगाथेवर आधारित '83' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग तत्कालीन भारतीय संघाचा कर्णधार कपिल देव यांच्या भूमिकेत आहे. ३ मिनिटं ४९ सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये, दिग्दर्शक कबीर खान तुम्हाला 1983 मध्ये घेऊन जातो, जेव्हा भारताने ऐतिहासिक विजय मिळवला होता. ते क्षण पुन्हा एकदा या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना जगता येणार आहेत. भारतीय संघाचा प्रवास, त्यांचा संघर्ष, त्यांचं यश-अपयश या सर्व गोष्टींची झलक यातून पहायला मिळते.

हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. येत्या २४ डिसेंबर रोजी हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण ही कपिल देव यांची पत्नी रुमी देवची भूमिका साकारणार आहे. २०१९ मध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली. सुरुवातीला हा चित्रपट १० एप्रिल २०२० रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली.

चित्रपटात ताहिर राज भसिन, जीवा, साकिब सलीम, जतिन सारना, चिराग पाटील, दिनकर शर्मा, निशांत दहिया, हार्डी संधू, साहिल खट्टर, अॅमी वर्क, आदिनाथ कोठारे, धैर्य कारवा, आर. बद्री, पंकज त्रिपाठी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तर रणवीर सिंगची पत्नी दीपिका पदुकोण चित्रपटात कपिल देव यांची पत्नी रुमी यांच्या भूमिकेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wani News : सप्तशृंगगडावर आज रंगणार कोजागरीचा महासोहळा; कावड यात्रेसह तृतीयपंथीयांचा छबिना उत्सव

Aapli ST App : बस स्टँडवर एसटीची वाट बघत थांबताय? तुमचं टेन्शन मिटलं! ‘Aapli ST’ अ‍ॅपवर कळणार Live लोकेशन, पण कसं? पाहा एका क्लिकवर

थैलावाचा साधेपणा! रस्त्यावर केलं जेवण, कामातून घेतला आध्यात्मिक ब्रेक

Mud Volcano: अंदमानमधील चिखलाचा ज्वालामुखी सक्रिय; भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग पाठवणार संशोधन पथक

Ahilyanagar News:'अहिल्यानगर शहरात प्रेम विवाहातून प्राणघातक हल्ले वाढले'; जोडप्यांचा टोकाचा निर्णय..

SCROLL FOR NEXT