Omkar Goverdhan Google
मनोरंजन

'आई कुठे काय करते' मधील अरुंधतीच्या मित्राचा 'प्रेमिकल लोचा' कळला का?

'व्हॅलेंटाईन डे' च्या दिवशी उलगडणार अभिनेता ओंकार गोवर्धनचं हे गुपित

प्रणाली मोरे

व्हॅलेंटाईनडे'(Valentine Day) च्या निमित्ताने 'स्टोरीटेल ओरिजनल' एक नवी कोरी विलक्षण ऑडिओ मालिका घेऊन येत आहे. आजची आघाडीची टेलिव्हिजन मालिका आणि चित्रपट लेखिका मनस्विनी लता रवींद्र यांनी लिहिलेली आणि लोकप्रिय युवा अभिनेता ओंकार गोवर्धन(Omkar Govardhan) आणि अभिनेत्री आरती मोरे(Aarti More) या मराठी सेलिब्रिटींचा सहभाग असलेली 'प्रेमिकल लोचा'ची गुलाबी कथा आपल्या तरुण प्रेमी रसिकांसाठी ऑडिओ सिरीजमध्ये 'स्टोरीटेल' प्रदर्शित करत आहे. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये गुपचूप राहणाऱ्या जोडप्याची ही धम्माल गोष्ट आहे.

Omkar Govardhan, Aarti More

साहिर आणि अनुजा दोघं एकत्रं फ्लॅट घेऊन राहतायत, लिव्ह इनमध्ये. दोघांचं सगळं उत्तम सुरू आहे आणि एकदिवस अचानक साहिरचे आईवडिल घरात येतात आणि त्यांना कळतं आपला मुलगा एका मुलीसोबत राहतोय. मग काय अनुजाच्या आईवडिलांना पण खबर पोहोचते. आणि साहिरचे टिपिकल मुंबईचे दोघंही नोकरी करणारे आईवडिल आणि अनुजाचे कोल्हापूरचे जून्या विचारांचे पुरुषप्रधानता मानणारे आईवडिल समोरसमोर येतात. दोन्ही पालकांचं एकाच गोष्टीवर एकमत होतं. लग्नं. पण अनुजाला लग्नं नकोय आणि साहिरला वाटतं काय हरकते. आणि सुरू होतो लोचा. मग पुढे काय होतं…..घरच्यांना लग्न न करण्यासाठी पटवतात की दबावाला झूकून लग्न करतात. अनुजाला खरंच साहिरबरोबर कायम रहायचं असतं की नसतं या सगळ्यांची उत्तरं ऐकण्यासाठी 'प्रेमिकल लोचा' ही सिरीज ऐकावी लागेल.

ही गोष्ट लिहीली आहे मनस्विनी लता रवींद्र यांनी आणि त्याला आवाज दिला आहे अभिनेता ओंकार गोवर्धन आणि अभिनेत्री आरती मोरे यांनी. ओंकारला आपण सध्या महाराष्ट्रातील घराघरात लोकप्रिय असलेल्या ‘आई कुठे काय करते’मध्ये पाहत आहोत. तसेच त्याला शाहिद कपूर, प्रियांका चोप्राच्या 'कमिने'मध्ये पाहिले आहे. मराठीत 'हा भारत माझा', 'संशय कल्लोल', त्यासोबतच 'डोक्याला शॉट', अश्या अनेक चित्रपटांमध्ये विविधरंगी भूमिकांमध्ये पाहिले आहे. तर अभिनेत्री आरती मोरेचा अभिनय 'झिंक चिक झिंक' या चित्रपटात बालकलाकार म्हणून तर ‘करार’, ‘बाबांची शाळा’, ‘चिं.सौ.कां.’, ‘उबुंटू’ इत्यादी चित्रपटांमध्ये पाहिला आहे. बालकलाकार ते एक परिपक्व आणि गुणी अभिनेत्री म्हणून ती सर्वश्रुत आहे. या दोघांसोबतच लेखिका मनस्विनी लता रवींद्र यांची संवादरुपी केमिस्ट्री 'प्रेमिकल लोचा' मध्ये बेमालून जमून आली आहे. सळसळत्या तरुणीची धम्माल उडवणारी खुमासदार कथा, ऐकण्यासाठी ‘स्टोरीटेल’ने १४ फेब्रुवारीचा मुहूर्त निवडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Government Farmers Gift: मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; कॅबिनेटमध्ये घेण्यात आले तीन महत्त्वाचे निर्णय!

Gautami Naik Exclusive: गल्ली क्रिकेट ते स्मृती मानधनाची बॅटिंग पार्टनर! किरण मोरेंनी हेरलेल्या गौतमी नाईकचा कसा राहिला प्रवास

Sun Transit Cance: १६ जुलैपासून सूर्याचा कर्क राशीत प्रवेश! वृषभ, धनु आणि मीन राशींना मिळणार विशेष लाभ, जाणून घ्या तुमचं राशी भविष्य

Uddhav Thackeray-Eknath Shinde Video: ''ते आले, त्यांनी पाहिलं अन् मग त्यांनी...'' ; उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे आमने-सामने!

अमरीश पुरी नाही, 'हा' अभिनेता असता 'मिस्टर इंडिया'चा मोगॅम्बो; अचानक दाखवला बाहेरचा रस्ता, आजही होतोय पश्चाताप

SCROLL FOR NEXT