Aai Kuthe Kay Karte Artist-Milind Gawali(Aniruddha),Madhrurani Prabhulkar(Arundhati),Omkar Govardhan(Ashutosh ) Google
मनोरंजन

'आई कुठे काय करते' मालिकेत रागाच्या भरात अनिरुद्धच्या हातून...

स्टार प्रवाह वाहिनीवरील ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर आहे.

प्रणाली मोरे

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते'(Aai Kuthe Kay KarteP) या मालिकेनं सुरुवातीपासूनच कथानकातील उत्कंठा कायम ठेवली आहे. यातील अरुंधती(Arundhati) किंवा अनिरुद्ध(Aniruddha) हे पात्रच नाही तर प्रत्येक पात्राला घराघरात ओळखलं जातं. प्रत्येक पात्राच्या भूमिकेचा ग्राफ हा तितकाच दर्जेदार रहावा म्हणून लेखिकेनं घेतलेली मेहनत दिसून येते. या मालिकेत अरुंधतीचा जुना मित्र आशुतोष केळकर याची एन्ट्री झाल्यापासून नवनवीन काहीना काही वळणं येतच आहेत. अरुंधतीच्या आयुष्यात आशुतोषच्या येण्यामुळे अनिरुद्धची जळफळाट होताना आता जास्त दाखवली जात आहे. त्यातूनच एक गोष्ट घडली आहे. आशुतोष अरुंधतीला गायिका म्हणून लॉंच करीत आहे. त्याचीच एक बातमी दोघांच्या फोटोसहित छापून येते. आणि तो फोटो पाहून अनिरुद्धचा पारा चढतो. आणि असं काही करून बसतो की...वाचा सविस्तर.

या मालिकेचा नवा प्रोमो नुकताच समोर आला आहे. ज्यात अप्पा हॉलमध्ये येतात आणि अरुंधतीला तिच्या वर्तमानपत्रातील छापून आलेल्या फोटोविषयी सांगतात. हे ऐकताच घरातील सगळे खूश होऊन पेपर पाहू लागतात, तेव्हा यश म्हणतो,''आई आणि आशुतोषचा पेपरमध्ये फोटो छापून आला आहे''. हे ऐकल्यावर मात्र अनिरुद्धच्या चेहऱ्यावरील रंग बदलतो. त्यानंतर यश संपू्र्ण बातमी कशी आशुतोषच्या कामाचा थोरवा सांगणारी आहे हे वाचून दाखवतो तेव्हा मात्र अनिरुद्धचा तिळपापड होतो आणि तो यशच्या हातातील पेपर खेचून घेत तो चुरगळून टाकतो आणि फेकून देतो. हे पाहून अरुंधती मात्र अस्वस्थ होते,तिला वाईट वाटतं खूप. त्यामुळे आता पुढे काय घडणार हे कमालीचं औत्सुक्य वाढवणारं असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan 20th Installment: शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा होण्याची शक्यता; लाभार्थी यादी कशी तपासाल?

Mumbai-Pune Expressway : चालकांची नियम मोडण्यात ‘द्रुतगती’, तब्बल २७ लाख वाहनांवर कारवाई; ४७० कोटींचा दंड, ५१ कोटी वसूल

Snake Video : गळ्यात साप, दातात साप! लाखों ‘जिवंत’ नाग घेऊन निघाली अनोखी नागपंचमी यात्रा; व्हिडीओ तुफान व्हायरल

काय सांगता? 'तारक मेहता...' मधील माधवी भाभी चेन स्मोकर आहे? म्हणते- मला काहीही फरक पडत नाही...

R. Madhavan Son's Daily Routine: "लवकर झोपा, लवकर उठा!" आर. माधवनचा मुलगा रोज उठतो पहाटे ४ वाजता! आयुर्वेदानुसार ब्रह्म मुहूर्तात उठणं आरोग्यासाठी का ठरते गेमचेंजर?

SCROLL FOR NEXT