Aai Kuthe Kay Karte latest update aniruddha forgot sanjana's birthday and celebrating success with veena
Aai Kuthe Kay Karte latest update aniruddha forgot sanjana's birthday and celebrating success with veena sakal
मनोरंजन

Aai Kuthe Kay Karte: दुसरी बायको सोडून तिसरीसाठीच अन्यानं आणला केक.. देशमुखांच्या घरात राडा

नीलेश अडसूळ

Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Latest Update : आई कुठे काय करते मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणार आहे. या मालिकेत रोज नवा ट्विस्ट येत आहे. त्यात अरूंधतीचे दुसरे लग्न आणि वीणाची एंट्री यामुळे मालिका टीआरपी मध्ये देखील पुढे आली आहे.

मालिकेत काही दिवसांपुर्वीची आशुतोषची बहीण वीणाची एंट्री झालीय. वीणा ही अनिरुद्धची बिझनेस पार्टनर आहे. शिवाय तिचा अनिरुद्धवर प्रचंड विश्वास आहे. एवढेच नाही तर त्यांच्यात आता मैत्रीचे संबंध बहरू लागले आहेत.

पण वीणाचं येणं आणि त्यांचे मैत्रीचे संबंध हेच आता अरुंधतीच्या आणि संजनाच्या संसारतली मोठी अडचण बनले आहेत.

नुकताच एक प्रोमो समोर आला आहे त्यामध्ये देशमुखांच्या घरात एक मोठा राडा झाल्याचे दिसत आहे.

( Aai Kuthe Kay Karte latest update aniruddha forgot sanjana's birthday and celebrating success with veena)

अनिरुद्ध एकीकडे आशुतोष आणि वीणा यांच्यामध्ये फुट पडून अरुंधतीच्या संसारात विश कळवत आहे. तर दुसरीकडे त्याने गोड बोलून वीणाचं मन जिंकलं आहे. आता तर वीणाने अनिरुद्धला तिच्या कंपनीचा सीइओ या सर्वोच्च पदी नेमलं आहे.

त्यामुळे अनिरुद्धला भलताच आनंद झालेला असतो. पण याच आनंदात तो आपल्या दुसऱ्या बायकोचा म्हणजेच संजनाचा वाढदिवस विसरतो, याचाच एक प्रोमो आता सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

या प्रोमो मध्ये दिसतंय की.. 'देशमुखांच्या घरात सगळेच मिळून संजनाचा वाढदिवस साजरा करत असतात. संजनाचा वाढदिवस सकाळपासूनच सगळे जोरदार पणे करत असतात. पण अनिरुद्धला मात्र याची जाणीव नसते. तो तिचा वाढदिवस विसरलेला असतो.'

आता मालिकेच्या आजच्या भागात संजनाचा वाढदिवस साजरा होत असतो. सगळेच खूप आनंद असतात. संजनाने आपला संसार मोडूनही अरूंधती तिच्यासाठी वाढदिवस करायला आलेली असते. पण ज्याच्यासाठी संजनाने इतके सायास केले, स्वतःचं संसार मोडला, तो अनिरुद्ध मात्र तिथे नसतो.

वाढदिवस झाल्यावर तिथे अनिरुद्ध येतो. त्याच्या हातात केक असतो. मात्र तो संजनासाठी नसतो तर वीणासाठी असतो. त्या दिवशी संजनाला सोडून पूर्ण दिवस वीणासोबत असतो. घरी आल्यावरही स्वतःच्या यशासाठी केक कापतो आणि वीणाला भरवतो.

हे सगळं पाहून घरातील सर्व मंडळींना मोठा धक्का बसतो. तर संजनाही खूप दुखावते. पण ती गप्प बसत नाही, ती सर्वांसमोर त्याला सुनावते. संजना म्हणते, 'काही दिवसांपूर्वी अरूंधतीच्या जागी मी होते आणि आज मी आहे तर वीणा माझ्या जागी..अजून किती जनींना फसवणार आहेस अनिरुद्ध.. ' या नंतर देशमुखांच्या घरात मोठा राडा होणार आहे, तो काय असेल हे आजच्या भागात कळेलच.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT