aai kuthe kay karte  
मनोरंजन

‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या सेटवर आगळीवेगळी वटपौर्णिमा

संजनासाठी अरुंधतीचं हे वागणं न पटणारं असलं तरी अरुंधती आपल्या मतावर ठाम असणार आहे.

स्वाती वेमूल

वरुणराजाचं आगमन झालं की तमाम स्त्रियांना आतुरता असते ती वटपौर्णिमा सणाची. वडाची पूजा करुन पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करणं हा या सणाचा महत्त्वाचा उद्देश. हा सण आपल्याला निसर्गाच्या जवळ जायला भाग पाडतो. वडाचं झाड म्हणजे ऑक्सिजनचा पुरवठा करणारी निसर्गाची देणगीच. सध्याच्या घडीला आपल्या प्रत्येकालाच या ऑक्सिजनचं महत्त्व पटतं आहे. त्यामुळेच वटपौर्णिमेच्या सणादिवशी वडाच्या झाडाच्या पूजनाला मोठं महत्त्व आहे. ‘आई कुठे काय करते’ Aai Kuthe Kay Karte मालिकेत वटपौर्णिमेचा सण साजरा झाला मात्र निराळ्या पद्धतीने. मालिकेच्या टीमने कुंडीतच वडाचं झाड लावून त्याची साग्रसंगीत पूजा केली. यानिमित्ताने प्रेक्षकांना देखील निसर्गाचं रक्षण करण्याचं आवाहन कलाकारांकडून करण्यात आलं. (aai kuthe kay karte vat purnima special episode)

‘आई कुठे काय करते’ मालिकेत सध्या अनिरुद्ध आणि अरुंधतीच्या नात्यात तणाव असला तरी अनिरुद्धच्या निरोगी आयुष्यासाठी अरुंधती प्रार्थना करणार आहे. संजनासाठी अरुंधतीचं हे वागणं न पटणारं असलं तरी अरुंधती आपल्या मतावर ठाम असणार आहे. अरुंधती आपल्या कृतीतून नेहमीच नवा आदर्श डोळ्यासमोर ठेवत असते. त्यामुळे या वटपौर्णिमेच्या सणादिवशीही नवरा बायकोच्या नात्याचं खरं महत्त्व ती संजनाला पटवून देणार आहे.

याशिवाय अंकिताचीही पहिलीच वटपौर्णिमा आहे. त्यामुळे देशमुख कुटुंबात वटपौर्णिमेच्या सणाची लगबग पाहायला मिळेल. ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.३० वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT