'Aai Kuthe Kay Karte' Starcast  Google
मनोरंजन

आई कुठे काय करते: देशमुखांच्या घरातनंच नाही, मालिकेतूनच एक्झिट;कोणाची?

मालिकेतील रंजक वळणांमुळे ही मालिका सध्या 'नंबर वन' पदावर आहे.

प्रणाली मोरे

'आई कुठे काय करते'(Aai Kuthe Kay Karte) ही मालिका खूप साधी,सरळ वाटते, इतर मालिकांप्रमाणे या मालिकेत ना किचन पॉलिटिक्स कधी पहायला मिळतं,ना कधी भरजरी साड्यात मेकअप केलेला महिला वर्ग ना कधी उगाचच आक्रास्ताळेपणा केलेल्या दृश्यांचा भडीमार या मालिकेत दिसतो. या मालिकेतील अरुंधती,अनिरुद्ध,संजना या पात्रांबरोबर इतर सगळीच पात्र प्रेक्षकांच्या मनात आपलं घर करुन राहिले आहेत. अनिरुद्धला लोकं त्याच्या वागण्यावरुन शिव्या जरी देत असले ना तरी ती त्याच्या भूमिकेला मिळालेली पसंतीची पोचपावतीच म्हणावी लागेल. आता मालिकेत काही अशी रंजक वळणं आली आहेत ज्यामुळे काही दिवसांपूर्वी मागे पडलेली ही मालिका पुन्हा नंबर वन पदावर येऊन पूर्ववत विराजमान झाली आहे.

अरुंधतीनं(Arundhati) आता देशमुखांचं घर सोडलं आहे. एक रात्र काय तिला रेकॉर्डिंगच्या निमित्तानं बाहेर गेलेली असताना परतीच्या वाटेवर अडचण येते म्हणून मित्रासोबत काढावी लागते, तर देशमुख ज्यांचा खरंतर तिला उलट-सुलट विचारण्याचा अधिकारच नाही ते सरळ तिच्यावर आरोपाच्या फैरी झाडतात. स्वाभिमानी अरुंधती तिथनं तडक बाहेर पडते अन् आता तर ती स्वतंत्र राहायला लागणार आहे. अर्थात हे असं सगळं रंजक सुरू आहे मालिकेत. आशुतोष-अरुंधतीच्या मैत्रीचा ट्रॅकही लोकांना आवडू लागला आहे. पण त्यातच आता बातमी आहे की मालिकेतनं अरुंधतीच्या जवळची खास अशी विमल या मालिकेतनंच बाहेर पडत आहे. विमल म्हणजे देशमुखाच्या घरात किचनची जबाबदारी इतर छोटीमोठी कामं सांभाळणारी महत्त्वाची व्यकती. जिच्या न येण्यानं देशमुखांच्या घरची घडी बिघडलेली दाखवायचे.

Seema Ghogle as 'vimal' In Aai Kuthe Kay Karte

तर अशी ही 'विमल' ची व्यक्तिरेखा सीमा घोगले या अभिनेत्रीनं साकारली होती. पण अचानक असे काय झाले की मालिकेचा टीआरपी ग्राफ वर चढत असताना,विमल या व्यक्तीरेखेला तितकंच महत्त्व मिळत असताना अचानक सीमा घोगलेनं मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. पण आता कळत आहे की,सोनी मराठीवर 'बॉस माझी लाडाची' या मालिकेत सीमा घोगले महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अर्थात त्यामुळेच तिनं 'आई कुठे काय करते' मालिकेतील विमलच्या व्यक्तीरेखेवर पाणी सोडलं असणार हे मात्र निश्चित.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT