Aamir Khan Movie News
Aamir Khan Movie News Aamir Khan Movie News
मनोरंजन

Aamir Khan : आमिर खानची धाव परदेशी चित्रपटाच्या रिमेकवर; शूटिंग २०२३ पासून?

सकाळ डिजिटल टीम

Aamir Khan Movie News आमिर खानही (Aamir Khan) सलमान प्रमाणेच रिमेकचा बादशहा होऊ पाहत आहे. आमिर खानचा नुकताच प्रदर्शित झालेला लाल सिंग चड्ढा हा हॉलिवूड चित्रपट द फॉरेस्ट गंपचा रिमेक होता. १८० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. चित्रपटाने केवळ ७० कोटींची कमाई केली. आता आमिर खान आणखी एका परदेशी चित्रपटाचा रिमेक करण्याच्या मार्गावर आहे. त्याच्या चित्रपटाचे शूटिंग २०२३ पासून सुरू होणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आमिर खानचा (Aamir Khan) पुढील चित्रपट ‘कॅम्पियन्स (२०१८)’ या स्पॅनिश चित्रपटाचा रिमेक असेल. चित्रपटाचे दिग्दर्शन आर. एस. प्रसन्ना करणार आहे. चित्रपटासाठी अनुष्का शर्माला साईनं केल्याचेही बोलले जात आहे. यापूर्वी अनुष्का शर्मा आणि आमिर खान यांची जोडी पीकेमध्येही दिसली होती. आमिर खानला आता लोकप्रिय परदेशी चित्रपटांचे रिमेक बनवून पुढे जायचे असल्याचे दिसून येते.

पीपिंग मूनच्या रिपोर्टनुसार, निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनचे काम सुरू केले आहे. चित्रपटासाठी सहा महिन्यांचे शेड्युल असणार असल्याचे बोलले जात आहे. सोनी पिक्चर्स इंडिया या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. आमिर खान सध्या अमेरिकेत सुट्टीवर असल्याने पुढील वर्षी जानेवारीमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्याची शक्यता आहे. अमेरिकेतून परतल्यानंतरच आमिर चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीस

SCROLL FOR NEXT