Aamir Khan stuck in Chennai Cyclone Michaung, South actor vishnu vishal rescue to help aamir khan SAKAL
मनोरंजन

Aamir Khan: आमिर खान अडकला चेन्नईच्या वादळात, साऊथ अभिनेता आला मदतीला धावून

चेन्नईमधील चक्रीवादळात अडकलेल्या आमिर खानच्या मदतीला धावला साऊथ अभिनेता

Devendra Jadhav

Chennai Cyclone Updates Aamir Khan: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘मिचाँग’ या तीव्र चक्रीवादळामुळे चेन्नईमधील दैनंदिन जीवनावर परिणाम झालाय.

बदललेल्या हवामानाचा तमिळनाडूची राजधानी चेन्नईला फटका बसला. चेन्नईसह नजीकच्या जिल्ह्यांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली.

अशातच एक मोठी बातमी समोर येतेय ती म्हणजे, चेन्नईच्या पूरजन्य परिस्थितीत प्रसिद्ध अभिनेता आमिर खान सुद्धा अडकलाय. त्याच्या मदतीला विष्णु विशाल हा साऊथ अभिनेता धावून आलाय.

(Aamir Khan stuck in Chennai Cyclone Michaung)

पुरात आमिर अडकला, साऊथ अभिनेत्याने केली मदत

साऊथ अभिनेता विष्णू विशालसुद्धा चेन्नईच्या पुरात अडकला होता. त्याने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर सुटका झाल्याचे उघड केले आहे.

सामान्य नागरिकांना वाचवण्यासाठी बोटी तैनात करण्यात आल्याचे दोन फोटो त्यांनी शेअर केली. या फोटोंमध्ये आमिर खान देखील दिसत आहे.

मिचौंग या चक्रीवादळाने चेन्नईमध्ये कहर केला आहे, शहरात जोरदार वादळामुळे मुसळधार पाऊस पडत आहे. दोन दिवसांपासून शहर ठप्प झाले आहे. आता, करापक्कममध्ये अडकलेला अभिनेता विष्णू विशाल याने अग्निशमन आणि बचाव विभागाने आपली सुटका केल्याचे उघड झाले आहे. यावेळी विष्णुने पुरात अडकलेल्या आमिरची सुद्धा मदत केली, असं दिसतंय.

घरात पाणी घुसलं, मोबाईलला नेटवर्क नाही

विशालने चेन्नईमधील भयानक चक्रीवादळ मिचौंगचा सामना करतानाचे फोटो X वर शेअर केलेत. विशालने लिहिले, "माझ्या घरात पाणी शिरत आहे आणि करपक्कममध्ये पाण्याची पातळी वाईटरित्या वाढत आहे. मी मदतीसाठी कॉल केला आहे. वीज नाही, वायफाय नाही, फोनला नेटवर्क नाही. फक्त टेरेसवर एका विशिष्ट ठिकाणी मला थोडंसं नेटवर्क मिळेल, अशी आशा. मोबाईलला नेटवर्क आलं तर येथील लोकांना काहीतरी मदत मिळेल. मला चेन्नईतील लोकांसाठी वाईट वाटते. #staystrong.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ‘’नितीश कुमार यांना भारतरत्न द्या’’, जेडीयू नेते केसी त्यागींची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी!

WPL 2026 : Nadine de Klerk ची अष्टपैलू कामगिरी, RCB ने थरारक सामन्यात मारली बाजी; गतविजेत्या MI ची हार

महत्त्वाची बातमी! महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता थांबणार; उमेदवारांचे पदयात्रा, घरोघरी भेटींवर भर, सोशल मिडियाचा वापर, वाचा...

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

SCROLL FOR NEXT