Abhijeet Bichukale Google
मनोरंजन

अभिजित बिचुकलेनं केला आत्महत्येचा प्रयत्न?'बिग बॉस१५' पुन्हा वादात...

घरातील इतर सदस्यांनी वाळीत टाकल्यानं टोकाचं पाऊल उचलण्याचं केलं धाडस

प्रणाली मोरे

बिग बॉस हिंदीच्या घरात वाईल्ड कार्ड स्पर्धक राखी सावंत,रश्मी देसाई,दवोलिना आणि अभिजित बिचुकले हे स्पर्धक आले खरे पण त्यानंतर बिग बॉस अधिक वादात सापडू लागलं ते इथं रोज घडणा-या नवनवीन ड्रामांमुळे. शो अधिक मनोरंजक झाला खरा पण आता तो जीवघेणा होत चाललाय असं म्हटलं तर वावगं ठरू नये. वाईल्ड कार्डच्या माध्यमातून बिग बॉसच्या घरात आलेला अभिजित बिचुकले(Abhijeet Bichukale) घरातील मंडळींना हैराण करून सोडेल असे सुरवातीला कुणालाही वाटले नव्हते. अभिजित बिचुकले बिग बॉसच्या घरात रोज अशा काही उचापती करत असतो ज्यामुळे घरातील वातावरण बिघडलंय.

दरम्यान काल तर अभिजित बिचुकलेने हद्दच केली. त्याचं झालं असं की देवोलिनाकडे किस मागितल्यामुळे बिग बॉसच्या घरातील सर्व मंडळी अभिजित बिचुकलेल्या विरोधात एकवटली अनं बिचुकले एकटा पडला. घरातील सदस्यांनी अभिजित बिचुकलेला बॉयकॉट केला असं म्हणूया नं. दरम्यान घरात एकटा पडत असल्याचे पाहून बिचुकलेने विषप्राशन करण्याची इच्छा व्यक्त केली. अभिजित बिचुकलेने निशांत जवळ जाऊन सांगितले की,'वॉशरुममध्ये कुठला कलर आहे का,मी ते खाऊ इच्छितो. कारण गेल्या दोन दिवसांपासून घरामध्ये जे काही होत आहे,त्यामुळे मी वैतागलो आहे'. अभिजित बिचुकलेचे हे म्हणणे ऐकून निशांत भट्टला धक्काच बसला. त्याने ही बाब शमिता आणि रश्मीला सांगितली.

त्यानंतर बिचुकलेच्या मनातील विचार समजल्यावर प्रतीक त्याच्याजवळ गेला. तसेच त्याने अभिजित बिचुकलेला समजावण्याचा प्रयत्न केला. 'तिकीट टू फिनाले' टास्कदरम्यान अभिजित बिचुकले याने देवोलिनाच्या मदतीच्या बदल्यात तिच्याकडे किसची मागणी केली होती. त्यानंतर देवोलिनाने ही गोष्ट सर्वांसमोर सांगितली अनं त्यानंतर बिग बॉसच्या घरातील बहुतांश लोक बिचुकलेच्या विरोधात एकत्र झाले. आता हा बिचुकले आधी काहीतरी उचापती करतो त्यानंतर आपली चूक कबल करीत नाही,जे इतरांच्या डोक्यात जातं. आता जर कुणी त्याला कान पकडून समजावू शकेल तर तो आहे शो चा होस्ट सलमान खान. दरम्यान विकेंडचा प्रोमो समोर आला असून त्यामध्ये सलमान खान बिचुकलेची खरडपट्टी काढण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: प्रदूषणाला रेल्वेचं जोरदार उत्तर! आता पैसा अन् वेळही वाचणार; भारतीय रेल्वेची नवी वाहतूक क्रांती सुरू, योजना काय?

Pune Court Decision: पतीला जीव देण्यास प्रवृत्त केलं, पत्नीला सात वर्षांची सक्तमजुरी! दुसरा विवाह अन्...

Latest Marathi Breaking News Live Update: शिवसेनेच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार - फडणवीस भेट

Akola News : सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे खाजगीकरण करण्याचा डाव; आ. साजिद खान यांचा स्फोटक आरोप

Leopard Attack : दोन बिबट्यांचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला; जीव धोक्यात घालून मेंढपाळ महिलेने केला प्रतिकार

SCROLL FOR NEXT