Bambu Trailer: अभिनयच्या प्रेमाचे बांबू लागणार की...? SAKAL
मनोरंजन

Bamboo Trailer: अभिनयच्या प्रेमाचे बांबू लागणार की...?

आगामी मराठी 'बांबू' सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय

सकाळ डिजिटल टीम

आगामी मराठी 'बांबू' सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. बॉईज फेम दिग्दर्शक विशाल देवरुखकर यांनी बांबू सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. सिनेमात अभिनय बेर्डे प्रमुख भूमिकेत आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडितने बांबू सिनेमाची निर्मिती केली आहे. ट्रेलर धम्माल आणि भन्नाट आहे.

ट्रेलरमध्ये अभिनय बेर्डे ब्रेकअप झालेल्या प्रत्येक मुलीला रडायला खांदा देतोय. प्रत्येक मुलगी अभिनयला ‘त्या’ नजरेनं कधी बघतंच नाहीए. पुढे त्याच्या आयुष्यात ‘त्या’ नजरेनं बघणारी मुलगी येते. मात्र या प्रेमात त्याचा मित्र पार्थ भालेराव आड येतो. आता अभिनयला त्याचं खरं प्रेम मिळणार की प्रेमात बांबू लागणार? याचे उत्तर सिनेमा पाहिल्यावरच मिळेल.

विशेष गोष्ट म्हणजे ट्रेलरमध्ये तेजस्विनी पंडितचीही खास झलक दिसत आहे. तेजस्विनीची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. बांबू २६ जानेवारीला रिलीज होतोय. सिनेमात अभिनय बेर्डे, पार्थ भालेराव, वैष्णवी कल्याणकर यांच्यासोबतच शिवाजी साटम, समीर चौघुले, अतुल काळे आणि स्नेहल शिदम असे लोकप्रिय कलाकार आहेत.

सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला असून सिनेमातील कलाकार आणि संपूर्ण टीम यावेळी उपस्थित होती. क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन निर्मित या सिनेमाचे निर्माते तेजस्विनी पंडित, संतोष खेर आहेत. 'बांबू' चे दिग्दर्शन विशाल देवरुखकर यांनी केले असून लेखन अंबर हडप यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

ENG vs IND: १ बॉल ६ धावा अन् भारताची कर्णधार आऊट; इंग्लंडचा भारतावर शेवटच्या चेंडूवर विजय

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

SCROLL FOR NEXT