actor Aamir Khan Elli Avrams Koi Jaane Na Song Har Funn Maula Viral on social media 
मनोरंजन

Video Viral; पंचविशीच्या आमीरचं 'हरफन मौला'; नेटक-यांची पसंती

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -  आमीरचा कुठलाही नवा चित्रपट आला की त्याबद्दल चाहत्यांना कमालीचा उत्सुकता असते. मिस्टर परफ्केशनिस्ट म्हणून त्याची ओळख आहे. तसेच आपल्या कलाकृतीमध्ये नाविन्य आणि वेगळेपणा देण्यासाठीही त्याचे नाव घेतले जाते. अशाप्रकारच्या परफॉर्मन्समुळे आमीरचे चित्रपट पाहणा-या प्रेक्षकांची संख्याही मोठी आहे. सध्या आमीरच्या कोई जाने ना या चित्रपटाची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी त्या गाण्याचा टीझर प्रदर्शित झाला होता. आता ते गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. त्याला 14 लाखांपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत.

लाल सिंग चढ्ढा चित्रपटाविषयी चर्चा सुरु असतानाच आमीरच्या नव्या गाण्यानं सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे.  याच्या कोई जाने ना चित्रपटातील हरफन मौला गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्या गाण्यात त्याच्या जोडीला अभिनेत्री एली एव्हरामही दिसत आहे. सोशल मीडियावर काही तासांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या गाण्याला मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळायला सुरुवात झाली आहे. सिक्रेट सुपरस्टार नंतर आमीरचा एकही चित्रपट आलेला नाही. त्यामुळे त्याच्या आगामी चित्रपटांची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. आमीरचा बहुचर्चित असा लाल सिंग चढ्ढा प्रेक्षकांच्या कुतूहलाचा विषय आहे.

हरफन मौला या गाण्याचा टीझर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात आमीरचा एक वेगळा लुक  प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्याचा कोई जाने ना नावाचा चित्रपट येत्या 26 मार्चला प्रदर्शित होणार आहे. त्यात अलाय अवराम, नेहा महाजन, आश्विनी काळसेकर यांच्या भूमिका आहेत. जेव्हा या गाण्याचा टीझर प्रदर्शित झाला तेव्हापासून आमीरच्या चित्रपटाचे वेध प्रेक्षकांना लागले आहे. हे पूर्ण गाणं आज प्रदर्शित झाले आहे.   
 गाण्यामध्ये आमीरचा एक रोमँटिक लुक पाहायला मिळणार आहे. टी सीरिजच्या वतीने तो प्रदर्शित केला जाणार आहे. त्यात आमीरचा डान्सही सुंदर झाला आहे.

अनेक वर्षानंतर तो अशाप्रकारच्या लुकमध्ये दिसणार आहे. यापूर्वी तो सिक्रेट सुपरस्टार आणि दंगलमध्ये वेगळ्या अंदाजात दिसला होता. त्यातील दंगल हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला होता. एका सत्यघटनेवर हा चित्रपट बेतला होता. त्याला केवळ भारतातच नव्हे तर जगभरात तो लोकप्रिय झाला  होता. हरफन मौला गाण्यात आमीरच्या जोडीला एलाय एव्हरामही आहे. तिया आणि आमीरचा डान्स चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

आमीरच्या या चित्रपटातील हे गाणे पाहिल्यानंतर प्रेक्षकांना त्याच्या या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. आतापर्यत या गाण्याला 14 लाखांपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत तर दहा हजारापेक्षा जास्त अधिक कमेंट्सचा त्यात समावेश आहे. अमिताभ भट्टाचार्य यांनी हे गीत लिहिले असून विशाल ददलानी यांनी संगीत दिले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal Century: जैस्वालची सुरुवात अन् शेवटही शतकाने! इंग्लंडच्या गोलंदाजांना चोपत मोठ्या विक्रमालाही घातली गवसणी

Jaykumar Gore : पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाडचे नेते नसुन देशाचे नेते आहेत, त्यांनी केलेल वक्तव्य हे त्यांना उशीरा सुचलेले शहानपण

ENG vs IND: 'बुमराह असो वा नसो, आमचं काम...', प्रसिद्ध कृष्णा जस्सीच्या न खेळण्यावर नेमकं काय म्हणाला?

Latest Maharashtra News Updates Live: इगतपुरी शहरात शनिवारी दुपारी पोलीसांचा रुट मार्च

Mumbai Traffic: मुंबईतील वाहतुकीत बदल, 'या' मार्गावर महिनाभर नो एन्ट्री; काय असतील पर्यायी मार्ग?

SCROLL FOR NEXT