actor anupam kher shares emotional post after kirron kher diagnosed with blood cancer requests fans for prayer 
मनोरंजन

माझ्या पत्नीसाठी सर्वांनी देवाकडे प्रार्थना करा, अनुपम खेर यांचं चाहत्यांना आवाहन 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - प्रसिध्द अभिनेत्री आणि खासदार किरण खेर यांना ब्लड कॅन्सर झाला आहे. ही बातमी कळताच त्यांच्या फॅन्सनं चिंता व्यक्त केली आहे. अनेकांनी त्यांच्या निरोगी आरोग्यासाठी देवाकडे प्रार्थनाही सुरु केली आहे. त्यावर त्यांचे पती अनुपम खेर यांनी एक पोस्ट सोशल मी़डियावर शेअर केली असून त्यातून चाहत्यांना भावनिक आवाहन केले आहे. प्रख्यात अभिनेत्री, भाजपच्या खासदार किरण खेर यांच्याविषयी बॉलीवूडमधून काळजी व्यक्त करण्यात आली आहे. त्याच्यावर अभिनेते अनुपम खेर, मुलगा सिकंदर खेर यांनी एक स्टेटमेंट प्रसिध्द केले आहे.

खेर कुटूंबियांकडून जे निवेदन प्रसिध्द करण्यात आले आहे त्यात असे म्हटले आहे की, किरण खेर यांना ब्लड कॅन्सर झाला आहे. आता आम्ही सर्व चाहत्यांना विनंती करतो की त्यांनी किरण खेर यांच्यासाठी प्रार्थना करावी. अनुपम खेर यांच्या त्या पोस्टवर अनेक सेलिब्रेटींनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. याशिवाय अनुपम खेर यांनी त्यांच्या इंस्टावर लिहिलेल्या पोस्टमध्ये असे म्हटले, केवळ अफवा पसरवून परिस्थितीत काही फरक पडणार नाही. त्यामुळे मी आणि सिकंदर तुम्हा सर्वांना सांगु इच्छितो, किरण यांची तपासणी केली असता त्यांना कॅन्सर झाल्याची माहिती पुढे आली आहे. सध्या त्यावर उपचार सुरु आहेत. मला पूर्ण खात्री आहे की, त्या अशाप्रकारच्या आजारातून लवकर ब-या होतील. 

आम्ही भाग्यवान आहोत की, त्यांच्यावर भारतातील प्रसिध्द डॉक्टर्स उपचार करत आहेत. ती पहिल्यापासून एक फायटर राहिली आहे. येणा-या कठीण प्रसंगांना कसे सामोरं जायचे याची तिला चांगली माहिती आहे. ती एक चांगली व्यक्ती आहे. त्यामुळे मी आपल्या सर्वांना अशी विनंती करतो की, त्यांनी लवकरात लवकर यातून बरे होण्यासाठी तुमच्या प्रार्थनेची गरज आहे. आतापर्यत आपण केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांना धन्यवाद. या शब्दांत अनुपम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मुंबईतच किरण खेर त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती भाजपाच्या सहकाऱ्याने दिली. किरण यांना मल्टिपल मायलोमा प्रकारचा ब्लड कॅन्सर झाला आहे. ६८ वर्षांच्या किरण खेर यांच्यावर गेल्या वर्षीपासून उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाल्याचं चंदीगडचे भाजप अध्यक्ष अरुण सूद यांनी सांगितलं. बुधवारी आयोजित केलेल्या खास पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates : हिंदीविरोधातील स्टॅलिन यांच्या लढ्याला आमच्या शुभेच्छा - संजय राऊत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT