मनोरंजन

नीनाला पाहिल्यावर 'ममीवाली फिलिंग' नव्हे तर...; काय म्हणाला आयुषमान?

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये काही मालिका अशा आहेत की ज्यांची लोकप्रियता गेली अनेक वर्षे टिकून आहेत. त्यापैकी एक म्हणजे कौन बनेगा करोडपती. सध्या या शो चं तेरावं पर्व सुरु आहे. बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन (amitabh bahcchan) या शो चे सुत्रसंचालन करत आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून केबीसीमध्ये चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी येणाऱ्या बॉलीवूड सेलिब्रेटींचे प्रमाण वाढले आहे. बॉलीवूडची कोणेएकेकाळची आघाडीची अभिनेत्री नीना गुप्ता (bollywood actress neena gupta) या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखल्या जातात. (Kaun Banega Crorepati 13)

सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असणाऱ्या नीना गुप्ता यांचे सच कहू (sach kahoo toh autobiography) तो नावाचे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे. त्यातून त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे सोशल मीडियावर व्हायरल केले होते. आपल्यावर लहानपणी झालेला लैंगिक अत्याचार, जवळच्या नातेवाईकांकडून आलेला अनुभव, बॉलीवूडमध्ये राहिलेली संघर्षमय वाटचाल, वैयक्तिक आयुष्य. प्रेमप्रकरणं याविषयी त्यांनी उघडपणानं भाष्य़ केलं आहे. त्याविषयी आपले विचार व्यक्त केले आहेत. अशा परखड स्वभावाच्या नीना गुप्ता कौन बनेगा करोडपती या मालिकेमध्ये आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

नीना गुप्ता म्हणाल्या, मला जेव्हा बधाई हो मध्ये भूमिका हवी होती तेव्हा त्यासाठी सलवार कुडता परिधान करण्याची अट घालण्यात आली होती. आपल्याला त्या चित्रपटाची कथा आवडली होती. मात्र त्यासाठी आपण त्या दिग्दर्शकाला फोन केला नाही. त्यानं आपल्याला फोन करुन बोलावून घेतले आणि मग त्यापुढची बोलणी सुरु झाली. या चित्रपटातील प्रमुख कलाकार आयुषमान खुराणा म्हणाला, या वयातही नीना गुप्ता कमालीच्या सुंदर दिसतात. त्या प्रभावी अभिनेत्री आहेत. त्यांच्याकडे पाहिल्यावर टिपिकल ममीवाली फिलिंग येत नाही. त्या अजूनही बोल्ड आणि हॉट असल्याची प्रतिक्रिया आयुषमाननं (ayushman khurana) दिली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

"माझी लाडकी जिवंत आहे", आई 3 दिवस मुलीच्या मृतदेहासोबत झोपली! पोलीस आले अन्...

Latest Marathi News Live Update : भाजप देशात २०० पार करणार नाही- आदित्य ठाकरे

Government Apps : आता बनावट अ‍ॅप्सवरुन होणारी फसवणूक टळणार! सरकारी अ‍ॅप्ससाठी गुगल प्ले स्टोअरने घेतला मोठा निर्णय..

SCROLL FOR NEXT