'लहानपणी डॉक्टरनं केलं शोषण'; अभिनेत्री नीना गुप्ता यांचा खुलासा

'लहानपणी डॉक्टरनं केलं शोषण'; अभिनेत्री नीना गुप्ता यांचा खुलासा

मुंबई - बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री म्हणजे नीना गुप्ता. त्या सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांची वाहवा मिळवताना दिसतात. काही महिन्यांपूर्वी त्यांचे सच कहू तो नावाचे आत्मचरित्र प्रकाशित झाले होते. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला. त्यातील धक्कादायक खुलासे चाहत्यांना भावले. त्यामुळे त्यांत्या आत्मचरित्राला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसुन आले आहे. नीना यांनी आताही असाच एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्यात त्यांनी आपल्याला लहानपणी कशाप्रकारे लैंगिक शोषणाला बळी पडावं लागलं याविषयी सांगितलं आहे.

बिनधास्त आणि बोल्ड अंदाजासाठी नीना गुप्ता ओळखल्या जातात. त्यांच्या या अंदाजामुळे त्यांना यापूर्वी अनेकदा ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागलं आहे. मात्र त्याचा त्यांच्या स्वभावावर काही एक परिणाम झालेला नाही. लहानपणी आपल्याला लैंगिक शोषणाला सामोरं जावं लागल्याचे त्यांनी सांगितलं आहे. आणि ते शोषण दुसरं कुणी नव्हे तर डॉक्टरांनी केले होते. असा खुलासा त्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. नीनानं आपल्या आईच्या भीतीमुळे ही गोष्ट कुणाला सांगितली नव्हती. नीनाला असं वाटतं की, तिच्यासोबत जे काही झालं त्यासाठी आपल्याच दोषी ठरवलं जाईल, असं त्यांना वाटल्यानं त्यांनी ती गोष्ट कुणालाही सांगितली नव्हती. आपल्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी या प्रसंगाचा उल्लेख केला आहे.

नीना जेव्हा शाळेत होत्या तेव्हा एकदा डोळ्यांच्या डॉक्टरकडे गेल्या होत्या. त्यांचा भाऊ वेटिंग रुममध्ये थांबला. आणि त्या डॉक्टरकडे गेल्या. डॉक्टरनं त्यांना तपासायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केलं. त्याचा आणि त्या तपासणीशी काही एक संबंध नव्हता. नीना यांना काही वेगळं होतंय याची जाणीव झाली तेव्हा त्या कमालीच्या घाबरुन गेल्या. मात्र त्या गोष्टीविषयी त्यांनी कुणालाही सांगितलं नव्हतं. हा प्रकार झाल्यानंतर त्या काही दिवस नैराश्यात होत्या. घरातील एका कोपऱ्यात बसून रडत असल्याची आठवण त्यांनी आपल्या पुस्तकात नमूद केली आहे.

'लहानपणी डॉक्टरनं केलं शोषण'; अभिनेत्री नीना गुप्ता यांचा खुलासा
अभिनेत्री नीना गुप्ताला का चिडल्या? Video झाला व्हायरल
'लहानपणी डॉक्टरनं केलं शोषण'; अभिनेत्री नीना गुप्ता यांचा खुलासा
विवियनची तुलना नाना पाटेकरांशी; नीना गुप्तांनी आशा भोसलेंना दिलं असं उत्तर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com