gaurav dixit 
मनोरंजन

ड्रग्ज प्रकरण: अभिनेता गौरव दीक्षितचा जामीन मंजूर; पासपोर्ट जप्त

कोर्टाच्या पूर्वपरवानगीशिवाय गौरवला मुंबई सोडता येणार नाही.

स्वाती वेमूल

ड्रग्ज प्रकरणी Drugs Case टेलिव्हिजन अभिनेता गौरव दीक्षितचा Gaurav Dixit जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने काही अटी-शर्तींवर गौरवचा जामीन मंजूर केला आहे. ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर गौरवला जामीन मिळाला असून आरोपपत्र दाखल होईपर्यंत त्याला आठवड्यातून तीनदा एनसीबी कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे. त्याचसोबत तपास अधिकाऱ्यांनी त्याचा पासपोर्ट जप्त केला आहे. कोर्टाच्या पूर्वपरवानगीशिवाय गौरवला मुंबई सोडता येणार नाही. २७ ऑगस्ट रोजी गौरवला अटक करण्यात आली होती.

एनसीबीच्या पथकाने गौरवच्या घरी धाड टाकत त्याच्या घरातून एमडी आणि चरस जप्त केलं होतं. अभिनेता एजाज खान ड्रग्ज प्रकरणात चौकशीदरम्यान गौरवचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर एनसीबीने त्याच्या घरी धाड टाकली होती. ड्रग पेडलर शादाब बटाटा याला अटक केल्यानंतर चौकशीदरम्यान अभिनेता एजाज खानचं नाव समोर आलं होतं. शादाब हा मुंबईतील सर्वांत मोठा ड्रग्ज सप्लायर फारुख बटाटा याचा मुलगा आहे. चित्रपटसृष्टीशी संबंधित लोकांना त्यांच्या मागणीप्रमाणे विविध ड्रग्ज उपलब्ध करून देण्यासाठी शादाब प्रसिद्ध होता. त्याच्या चौकशीतून अभिनेता एजाजचं नाव पुढे आलं होतं. एप्रिल महिन्यात मुंबई विमानतळावरून एजाजला एनसीबी पथकाने ताब्यात घेतलं.

एप्रिल महिन्यात एनसीबीने गौरव दीक्षितच्या मुंबईतील लोखंडवाला इथल्या निवासस्थानी छापा टाकला होता. त्यावेळी एनसीबीला त्याच्या घरी अंमली पदार्थ सापडले होते. मात्र गौरव घरातून पळाला होता. तेव्हापासून एनसीबी त्याच्या शोधात होती. गौरवने अनेक मालिका आणि जाहिरातींमध्ये काम केलंय. 'हॅपी भाग जाएगी', 'हॅपी फिर भाग जाएगी' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik News : भावनांना शब्द नाहीत! बहिणीच्या हातात राखी पण डोळ्यांत अश्रू, समोर शांत अन् कायमचा दूर गेलेला ३ वर्षांचा चिमुकला भाऊ

'लपंडाव'पाठोपाठ स्टार प्रवाहवर येतेय आणखी एक नवीकोरी मालिका; टीझरमधल्या दोघांना ओळखलं का?

Pune: मुंबईनंतर पुण्यातील कबुतर खाद्यबंदीचा वाद उच्च न्यायालयात, थेट पालिकेच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल

Amar Kale News: शरद पवारांपाठोपाठ खासदार अमर काळेंचंही खळबळजनक विधान; म्हणाले, 'निवडणूक जिंकण्यासाठी...'

Rahul Gandhi Vs Election Commission: राहुल गांधींनी केलेले 'मत चोरी'चे आरोप अन् निवडणूक आयोगाचं प्रत्युत्तर; वाचा सविस्तर!

SCROLL FOR NEXT